सातशे एनसीएमसी कार्ड चे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते *डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप* *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल - पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी दि. 20 एप्रिल - एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे 700 लाभार्थ्यांना सवलतीच्या प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळत असून जनजागृतीलाही चालना मिळत आहे. या उपक्रमांतर्गत “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना”, “महिला सन्मान योजना” तसेच दिव्यांग प्रवासी सवलत योजना यांचा समावेश असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, “75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलत आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना शासनाची सामाजिक बांधिलकी दर्शवतात. प्रत्येक पात्र व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपले कार्ड काढून घ्यावे आणि या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या स्मार्ट कार्डद्वारे ‘वॉलेट टॉप-अप’ सुविधा उपलब्ध असून किमान 100 रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. बसमधील ई-तिकीट मशीन, संकेतस्थळ, मोबाईल अॅप व अधिकृत केंद्रांमार्फत ही सेवा मिळणार आहे. आधार संलग्नतेमुळे प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील एसटी आगार व बसस्थानकांवर या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे दिलीप माळी यांनी केले. प्रास्ताविक बसस्थानक नियंत्रक शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सोपान माळी यांनी मानले. *यांची होती उपस्थिती* या वेळी शिवाजी पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, दिलीप माळी, सोपान माळी, आबा माळी, ग्रामपंचायत सदस्य चंदू इंगळे, अनिल माळी, समाधान माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग उपस्थित होते.

- मराठवाड्यात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा इशारा 🌩️ मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्वाचे मुद्दे: 30–40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना काही भागात जोरदार सरींची शक्यता तापमानात किंचित घट होणार कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचना: वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नका विजांच्या वेळी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा शेतकऱ्यांनी पिकांची आणि साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1
- रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू1
- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- चाकूर (लातूर) हादरले: दोन चुलत भावंडे बेपत्ता; एका मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ चाकूर येथे १९ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुने महादेव मंदिर गल्ली परिसरातील स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलत भाऊ रविवारी सकाळी बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, देवांश मंगेश स्वामी (वय ६-७ वर्षे) आणि साईचरण दिनेश स्वामी (वय १०-११ वर्षे) हे दोघे सकाळी सुमारे ७ वाजता घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. दरम्यान, दुपारी चाकूर-उजळंब मार्गालगत एका पडक्या घराजवळील मोकळ्या जागेत देवांशचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे हा परिसर त्यांच्या घरापासून अवघ्या ६० फूट अंतरावर आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. साईचरणबाबत सुरुवातीला तोही बेपत्ता असल्याची माहिती होती; मात्र काही अहवालांनुसार तो नंतर सुखरूप सापडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत पुष्टीसाठी पोलिस तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत शोधमोहीम हाती घेतली. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ८ ते १० पथके, फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, मुलं आझाद चौकात सायकलवर दिसल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना अपघाती आहे की घातपात, याचा तपास सुरू असून पोलिस सर्व शक्यतांचा बारकाईने शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण चाकूर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1
- वडाळी हादरली! पोलिसांत तक्रार होऊनही चोर पुन्हा त्याच ठिकाणी परतले; ४ लाखांचे सोने लंपास.1