गो.से.हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा मानसी भिवसने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण गो.से.हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा मानसी भिवसने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण पाचोरा - श्री. गो. से. हायस्कूलची माजी विद्यार्थिनी मानसी प्रमिला सुनील भिवसने हिने डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक येथून एम. बी. बी. एस. ची पदवी घेऊन डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला असून तिने श्री.गो. से. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ती श्री. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक सुनील देवचंद भिवसने यांची कन्या असून तिने प्राथमिक शिक्षण सु. भा. पाटील विद्यालय तसेच माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूल येथून पूर्ण केले तर व उच्च माध्यमिक शिक्षण एम. एम. कॉलेज येथे घेतले. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचेसह शहरातील सर्व शैक्षणिक,सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गो.से.हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा मानसी भिवसने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण गो.से.हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा मानसी भिवसने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण पाचोरा - श्री. गो. से. हायस्कूलची माजी विद्यार्थिनी मानसी प्रमिला सुनील भिवसने हिने डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक येथून एम. बी. बी. एस. ची पदवी घेऊन डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला असून तिने श्री.गो. से. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ती श्री. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक सुनील देवचंद भिवसने यांची कन्या असून तिने प्राथमिक शिक्षण सु. भा. पाटील विद्यालय तसेच माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूल येथून पूर्ण केले तर व उच्च माध्यमिक शिक्षण एम. एम. कॉलेज येथे घेतले. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचेसह शहरातील सर्व शैक्षणिक,सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
- Post by Anis qureshi sillod1
- धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००1
- Post by Anis qureshi sillod1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Post by Gani Bhai1