नांदगाव नगरीत गणरायाचे जल्लोषात आगमन ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरण; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव नगरीत गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात आगमन झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त विविध गणेश मंडळांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बालगोपाळ, युवक तसेच महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गावातील प्रमुख रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सजावट व नियोजनासाठी परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावात सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. गणरायाच्या आगमनाने नांदगाव नगरीत आनंदाचे वातावरण पसरले असून भक्तांनी मोठ्या श्रद्धेने बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! बातमी : किशोर खैरनार, पत्रकार, सारथी महाराष्ट्राचा नांदगाव, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

- जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,1
- गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4
- बुलढाण्यात महायुतीत मोठा स्फोट: खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत संजय गायकवाड आक्रमक; म्हणाले, "गरज पडल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार!"1
- जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1
- जरांगे पाटील मुंबईला रवाना होत असताना परिवारासोबतचा भाऊक करणारा क्षण,1