मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील मुरादपूर येथे घडली आहे. चिखली :- शेतात अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने तसेच शेतीवरील बँकेचे पीक कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील मुरादपूर येथे घडली आहे. मुरादपूर येथील समाधान सखाराम गाडेकर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे गट नंबर ६० मध्ये सुमारे ३ एकर सामाईक शेती असून त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. यावर्षी शेतीत अपेक्षित उत्पादन न झाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी, तसेच मागील वर्षी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेमुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. शनिवारी ते पत्नी व मुलासोबत शेतात गेले होते. पत्नी व मुलगा एका बाजूला काम करत असताना, त्यांनी एकांत साधून विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळत आहे. काही वेळानंतर ते दिसत नसल्याने पत्नीने शोध घेतला असता ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.

- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील कोट नांद्रा येथे श्रीराम संकरित बायो सीड्स कंपनीच्या 97 99 मका वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शेतकऱ्यांनी मोठी हजेरी लावली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by Labour addaa.1
- किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- Post by Swal Jansamannyaca ...1