logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आभाळाकडे टक लावून बळीराजा; २४ दिवसांपासून पावसाची हुलकावणी.... *आभाळाकडे टक लावून बळीराजा; २४ दिवसांपासून पावसाची हुलकावणी रिसोड खरीप हंगामातील पिके सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पावसाने दडी मारल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत केवळ तीन दिवस पाऊस झाल्याने गेल्या २४ दिवसांपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरणीच्या अवस्थेत आहे. याच काळात पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोज आभाळ भरून येते आणि पाऊस होईल, अशी आशा निर्माण होते; मात्र काही वेळातच ढग विरळ होऊन पाऊस न देताच निघून जातात. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतातील ओलावा कमी होत आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी अपेक्षित मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीची तहान कायम असून पिकांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. यंदा सुरुवातीच्या रिमझिम पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मेहनत, बियाणे, खत आणि मशागतीवर मोठा खर्च केल्यानंतर आता पीक हाताशी येण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा; पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ अशी आर्त हाक सध्या ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. आता तरी वरुणराजाने कृपा करून जोरदार पाऊस बरसावा आणि शेतातील पिकांना जीवदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

3 hrs ago
user_Suresh Badrigiri Giri
Suresh Badrigiri Giri
Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    1
    पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!
दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
    1
    शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • पुणे–नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक; टिपर चालकाचा मृत्यू, ३ जण गंभीर तर १५ ते २० प्रवासी जखमी पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वाहतूक ठप्प अपघातानंतर पुणे–नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
    1
    पुणे–नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक; टिपर चालकाचा मृत्यू, ३ जण गंभीर तर १५ ते २० प्रवासी जखमी
पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून, एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वाहतूक ठप्प
अपघातानंतर पुणे–नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली. *हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी* जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    1
    जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..

आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
*हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी*
जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 min ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    1
    इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश
रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे.
आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद
मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; 
कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.