logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुसद जिल्हा न्यायालयाची आणि शासनाची पोलिस अधिकाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक; अपहाराचा धक्कादायक फौजदारी घोटाळा समोर पोलीस स्टेशनमध्ये नोंद नसलेल्या गुन्ह्यावर बनावट व बोगस आरोपपत्र दाखल करणे, त्या प्रकरणात सरकारी वकिलांची नेमणूक करणे आणि सरकारी निधीतून लाखो रुपयांचे मानधन देणे असे गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत. तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू व कटात सामील इतरांविरुद्ध फौजदारी व न्यायालयीन अवमान कारवाईसाठी मुख्य न्यायमूर्तींकडे ठोस पुरावे सादर न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे की, पुसद पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या FIR क्रमांक 421/2010 च्या आधारे पुसद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. कुमलाल आडे यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करून प्रकरण चालविण्यात आले; मात्र पुसद पोलिसांच्या अहवालानुसार असा कोणताही गुन्हा पुसद पोलीस स्टेशनमध्ये नोंदच नसल्याचे समोर आले आहे. बोगस प्रकरणात अटक व बदनामी झाल्याने मुर्सलीन शेख यांच्या वतीने ज्ञानेश्वर कडू व इतरांविरुद्ध 10 कोटींची नुकसानभरपाई नोटीस व फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात ‘सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय पक्षकार संघटनेचे’ अध्यक्ष श्री. राशिद खान पठाण यांनी सर्व पुराव्यासह शपथपत्रावर तक्रार दाखल केली आहे. मुंबई (विशेष प्रतिनिधी) — पुसद जिल्हा न्यायालयात एक वेगळाच गंभीर घोटाळा उघडकीस आला असून, पोलीस स्टेशनमध्ये नोंद नसलेल्या गुन्ह्यावर बनावट व बोगस आरोपपत्र दाखल करणे, त्या प्रकरणात सरकारी वकिलांची नेमणूक करणे आणि सरकारी निधीतून लाखो रुपयांचे मानधन देणे असे गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश, पुसद न्यायालय यांनी दिनांक 08.06.2011 रोजी दिलेल्या आदेशानुसार, पुसद न्यायालयातील फौजदारी प्रकरण क्रमांक 932/2010 हे प्रकरण पुसद पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या FIR क्रमांक 421/2010 च्या आधारे पुसद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. कुमलाल आडे यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करून चालविण्यात आले होते. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून श्री. राठी यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच पोलिसांतर्फे अनेक साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांनी पोलिसांची केस खोटी असल्याचे स्पष्ट पुरावे न्यायालयासमोर सादर केले, ज्यामुळे मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश, पुसद यांनी दिनांक 08.06.2011 रोजी दिलेल्या आदेशानुसार श्री. मुर्सलीन शेख यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र, या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पुसद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी आश्चर्यकारक भूमिका घेत संबंधित तक्रार व भा.दं.वि. कलम 409 सह इतर गंभीर कलमांखालील दाखलपत्र हा गुन्ह्यात मोडत नसल्याचे नमूद करून FIR नोंद करण्यास टाळाटाळ केली आणि आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे, त्यांनी दिनांक 14.03.2026 रोजी दिलेल्या अहवालात FIR क्रमांक 421/2010 च्या आधारे पुसद न्यायालयात चाललेल्या फौजदारी प्रकरण क्रमांक 932/2010 ची चौकशी करण्याऐवजी, जाणूनबुजून न्यायालयात दाखल फौजदारी प्रकरण क्रमांक 3095/2008 ची चौकशी केल्याचे त्यांच्या पत्रातील मजकुरातून स्पष्ट झाले आहे. यामुळे चौकशीची दिशा मुद्दाम बदलून आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी अशा प्रकारे आणखी किती बोगस फौजदारी प्रकरणे दाखल केली, त्यामधून किती सरकारी निधी खर्च झाला आणि किती कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला, याची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई, विभागीय चौकशी आणि आर्थिक अपहाराचा तपास करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या बोगस प्रकरणात श्री. मुर्सलीन शेख यांना अटक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने व त्या आधारे त्यांची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला असून, श्री. मुर्सलीन शेख यांच्या वतीने आरोपी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू व इतर संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची नोटीस पाठविण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात फौजदारी व इतर कायदेशीर कारवाईही दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. पुसद न्यायालयाचा दिनांक 08.06.2011 रोजीचा आदेश डाउनलोड करा

8 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
8 hrs ago
180ea80d-74b2-4c4f-a8f8-cdbac22c2596

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    1
    हिंगोली | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच  जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे,  जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    1
    इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    user_Sajid Patlewale
    Sajid Patlewale
    दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    10 hrs ago
  • दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे.  दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    1
    दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. 
दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    मंठा, 
पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे.
या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.