कु. श्रीकांत बाबासाहेब सोमवंशी याचे जेईई परीक्षेत मोठे यश लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यातील श्रीकांत बाबासाहेब सोमवंशी या विद्यार्थ्याने देशातील अत्यंत कठीण व स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या JEE जे ई ई मुख्य परीक्षेत तब्बल 99.58 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय आणि दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून अत्यंत मर्यादित साधनसामग्रीमध्ये अभ्यास करत देशपातळीवरील स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. श्रीकांतने आपल्या जिद्दीच्या बळावर, मेहनतीच्या जोरावर आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे हे यश मिळवून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण धानोरा गाव, औसा तालुका आणि लातूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आजच्या पिढीतील इतर विद्यार्थ्यां साठी तो प्रेरणादायी आदर्श ठरेल, यात शंका नाही. अशा प्रकारे अनेक गुणवंत विद्यार्थी घडावेत आणि आपल्या मातीतूनच देशाचे भवितव्य घडवणारे अभियंते, वैज्ञानिक आणि अधिकारी निर्माण व्हावेत, हीच अपेक्षा. अशा पद्धतीच्या शुभेच्छा देत अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1