मोतिबिंदूमुक्तीसाठी ‘नवदृष्टी’ अभियान; गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा ! माजी मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन मोतिबिंदूमुक्तीसाठी ‘नवदृष्टी’ अभियान; गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा माजी मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन; १ सप्टेंबरपासून गावोगावी नेत्र तपासणी शिबिरे १० हजार गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घनसावंगी | प्रतिनिधी कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून मागील अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘नवदृष्टी महाअभियान’ चा पुढील टप्पा १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल १० हजार गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी मिळवून देण्यात आली आहे. आगामी टप्प्यात गाव-वस्त्यांवरील गरजू ज्येष्ठ नागरिकांना अंधत्वाच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी गावोगावी मोतिबिंदू तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान मोतिबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुणे येथील प्रसिद्ध एच. व्ही. देसाई हॉस्पिटल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानात गावागावातील तरुणांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गावनिहाय तपासणी शिबिरांचे नियोजन ‘नवदृष्टी महाअभियान’अंतर्गत १ सप्टेंबरपासून विविध गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. - १ सप्टेंबर — घनसावंगी - २ सप्टेंबर — पानेवाडी - ३ सप्टेंबर — पिंपरखेड - ४ सप्टेंबर — मूर्ती - ५ सप्टेंबर — गुंज - ६ सप्टेंबर — ढाकेफळ - ७ सप्टेंबर — सिद्धेश्वर पिंपळगाव - ८ सप्टेंबर — राजेगाव - ९ सप्टेंबर — भांबेरी - ११ सप्टेंबर — बळेगाव - १२ सप्टेंबर — अंतरवाली सराटी - १३ सप्टेंबर — सुखापुरी - १५ सप्टेंबर — घुंगर्डे हादगाव - १६ सप्टेंबर — साडेगाव - १७ सप्टेंबर — दुनगाव - १९ सप्टेंबर — महाकाळा - २० सप्टेंबर — भार्डी - २१ सप्टेंबर — पाथरवाला यानंतर तालुक्यातील उर्वरित गावांमध्येही टप्प्याटप्प्याने नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजीमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. १० हजार रुग्णांना नवदृष्टी देण्याचा टप्पा पार केल्यानंतर आता गावोगावी पोहोचणाऱ्या या अभियानामुळे मोतिबिंदूच्या समस्येने त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

- जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.1
- संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..1

- जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह1
- *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.2
- पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.1
- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत. ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.1