logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रामटेक तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यात पसरली चिंता रामटेक तालुका धान पिकासाठी विख्यात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक धान आहे.धान पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्याची चांगली उपलब्धता असावी लागते.परंतु जुलै महिना संपला तरी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.लवकरच पावसाचे पाणी योग्य व पुरेशा प्रमाणात पडले नाही तर तालुक्यात धान पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

6 hrs ago
user_Umesh Fulbel
Umesh Fulbel
रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
6 hrs ago

रामटेक तालुक्यात पावसाअभावी शेतकरी हवालदिल; शेतकऱ्यात पसरली चिंता रामटेक तालुका धान पिकासाठी विख्यात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक धान आहे.धान पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी पावसाच्या पाण्याची चांगली उपलब्धता असावी लागते.परंतु जुलै महिना संपला तरी तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.लवकरच पावसाचे पाणी योग्य व पुरेशा प्रमाणात पडले नाही तर तालुक्यात धान पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    1
    Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त मुख्यध्यापक श्री. ठाकरे सर व डाकोडे सर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले.
    1
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव  येथे मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव  येथे मैत्री दिनानिमित्त मुख्यध्यापक श्री. ठाकरे सर व डाकोडे सर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले.
    user_Pankhaj Rane
    Pankhaj Rane
    Taxi Driver अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गोंदिया में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत आयोजित "कर्तव्य साधना सप्ताह" एवं महाराजस्व शिविर का सफल समापन हुआ। इस अभियान के माध्यम से कुल 17,153 लाभार्थियों को विभिन्न शासकीय योजनाओं का लाभ प्रदान किया गया। गोंदिया में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत आयोजित "कर्तव्य साधना सप्ताह" एवं महाराजस्व शिविर का सफल समापन हुआ। इस अभियान के माध्यम से कुल 17,153 लाभार्थियों को विभिन्न शासकीय योजनाओं का लाभ प्रदान किया गया। इस वीडियो में जानिए— ✅ महाराजस्व अभियान की प्रमुख उपलब्धियाँ ✅ किन-किन योजनाओं का मिला लाभ ✅ 24 विभागीय स्टॉल के माध्यम से दी गई सेवाएँ ✅ अभियान की खास बातें और जनहित से जुड़ी पूरी जानकारी अगर आपको यह वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 📤 और Subscribe 🔔 जरूर करें ताकि आपको गोंदिया और आसपास की हर बड़ी खबर सबसे पहले मिलती रहे। Kohram News Gondia 🎤 भुषण राजे #Gondia #MaharajaswaAbhiyan #KartavyaSadhanaSaptah #VinodAgrawal #GovernmentSchemes #Maharashtra #KohramNews #GondiaNews #AyushmanBharat #PMKisan #RevenueCamp
    1
    गोंदिया में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत आयोजित "कर्तव्य साधना सप्ताह" एवं महाराजस्व शिविर का सफल समापन हुआ। इस अभियान के माध्यम से कुल 17,153 लाभार्थियों को विभिन्न शासकीय योजनाओं का लाभ प्रदान किया गया।
गोंदिया में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत आयोजित "कर्तव्य साधना सप्ताह" एवं महाराजस्व शिविर का सफल समापन हुआ। इस अभियान के माध्यम से कुल 17,153 लाभार्थियों को विभिन्न शासकीय योजनाओं का लाभ प्रदान किया गया।
इस वीडियो में जानिए— ✅ महाराजस्व अभियान की प्रमुख उपलब्धियाँ
✅ किन-किन योजनाओं का मिला लाभ
✅ 24 विभागीय स्टॉल के माध्यम से दी गई सेवाएँ
✅ अभियान की खास बातें और जनहित से जुड़ी पूरी जानकारी
अगर आपको यह वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 📤 और Subscribe 🔔 जरूर करें ताकि आपको गोंदिया और आसपास की हर बड़ी खबर सबसे पहले मिलती रहे।
Kohram News Gondia
🎤 भुषण राजे
#Gondia #MaharajaswaAbhiyan #KartavyaSadhanaSaptah #VinodAgrawal #GovernmentSchemes #Maharashtra #KohramNews #GondiaNews #AyushmanBharat #PMKisan #RevenueCamp
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लेकीच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय पुराम यांचा सेवाभावी आदर्श; पूजन, गोसेवा, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणातून दिला समाजसेवेचा संदेश नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव विधानसभा, दि. २ ऑगस्ट:** वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत सेवाभाव आणि संस्कार जपण्याची संधी असते, हा प्रेरणादायी संदेश आमदार संजय पुराम यांनी आपल्या कन्या समृद्धी (चिऊ) हिच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिला. हरदोली येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणी विधिवत पूजन करून समृद्धीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच वेळी भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथील सुरभि गौशाला येथे भेट देऊन गोमातेचे पूजन करण्यात आले. गोमातेला हिरवा चारा, भाजीपाला आणि पशुखाद्य अर्पण करून गोसेवा करण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच दिवशी कारंजा येथील बाल-भाऊ देवरस सरस्वती उच्चतर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहवासात समृद्धीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षणाबद्दलचा उत्साह आणि समाजसेवेची प्रेरणा हेच या वाढदिवसाचे खरे समाधान असल्याची भावना आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरचे अध्यक्ष रोहित अग्रवाल, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालय परिवाराचे त्यांनी आभार मानले. समाजसेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले.
    1
    लेकीच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय पुराम यांचा सेवाभावी आदर्श; पूजन, गोसेवा, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणातून दिला समाजसेवेचा संदेश
नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
आमगाव विधानसभा, दि. २ ऑगस्ट:** वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत सेवाभाव आणि संस्कार जपण्याची संधी असते, हा प्रेरणादायी संदेश आमदार संजय पुराम यांनी आपल्या कन्या समृद्धी (चिऊ) हिच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिला.
हरदोली येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणी विधिवत पूजन करून समृद्धीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच वेळी भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथील सुरभि गौशाला येथे भेट देऊन गोमातेचे पूजन करण्यात आले. गोमातेला हिरवा चारा, भाजीपाला आणि पशुखाद्य अर्पण करून गोसेवा करण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
याच दिवशी कारंजा येथील बाल-भाऊ देवरस सरस्वती उच्चतर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहवासात समृद्धीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षणाबद्दलचा उत्साह आणि समाजसेवेची प्रेरणा हेच या वाढदिवसाचे खरे समाधान असल्याची भावना आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरचे अध्यक्ष रोहित अग्रवाल, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालय परिवाराचे त्यांनी आभार मानले.
समाजसेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न! काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला. बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी चिमुरड्यांचे स्वागत केले. शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
    2
    वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश
काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; 
जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न!
काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला.
बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी  चिमुरड्यांचे स्वागत केले.
शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे  पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भंडारा नगरपालिकेच्या कारभाराची काँग्रेसकडून पोलखोल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रस्त्यांवरील खड्डे, घाणीचे साम्राज्य अन् शाळांमधील शिक्षकांची कमतरता भंडारा : भंडारा शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, शहरातील विविध नागरी समस्यांचे चित्र या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. ‘नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल’ असा दावा करत काँग्रेसकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता भंडारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
    1
    भंडारा नगरपालिकेच्या कारभाराची काँग्रेसकडून पोलखोल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्त्यांवरील खड्डे, घाणीचे साम्राज्य अन् शाळांमधील शिक्षकांची कमतरता
भंडारा : भंडारा शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, शहरातील विविध नागरी समस्यांचे चित्र या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे.
‘नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल’ असा दावा करत काँग्रेसकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या व्हिडिओमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता भंडारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला...वृद्धाला केली मारहाण... भंडारा :भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्ध महिलेवर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे.लाखांदूर तालुक्यातील मासळ गावात ही घटना घडली. जादूटोण्याचा आरोप करत चार जणांनी एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
    1
    जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला...वृद्धाला केली मारहाण...
भंडारा :भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयातून एका वृद्ध महिलेवर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे.लाखांदूर तालुक्यातील मासळ गावात ही घटना घडली. जादूटोण्याचा आरोप करत चार जणांनी एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.