भंडारा नगरपालिकेच्या कारभाराची काँग्रेसकडून पोलखोल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रस्त्यांवरील खड्डे, घाणीचे साम्राज्य अन् शाळांमधील शिक्षकांची कमतरता भंडारा : भंडारा शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, शहरातील विविध नागरी समस्यांचे चित्र या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. ‘नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल’ असा दावा करत काँग्रेसकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता भंडारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भंडारा नगरपालिकेच्या कारभाराची काँग्रेसकडून पोलखोल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रस्त्यांवरील खड्डे, घाणीचे साम्राज्य अन् शाळांमधील शिक्षकांची कमतरता भंडारा : भंडारा शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, शहरातील विविध नागरी समस्यांचे चित्र या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. ‘नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल’ असा दावा करत काँग्रेसकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता भंडारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
- लेकीच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय पुराम यांचा सेवाभावी आदर्श; पूजन, गोसेवा, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणातून दिला समाजसेवेचा संदेश नमस्कार सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव विधानसभा, दि. २ ऑगस्ट:** वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत सेवाभाव आणि संस्कार जपण्याची संधी असते, हा प्रेरणादायी संदेश आमदार संजय पुराम यांनी आपल्या कन्या समृद्धी (चिऊ) हिच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिला. हरदोली येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणी विधिवत पूजन करून समृद्धीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच वेळी भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथील सुरभि गौशाला येथे भेट देऊन गोमातेचे पूजन करण्यात आले. गोमातेला हिरवा चारा, भाजीपाला आणि पशुखाद्य अर्पण करून गोसेवा करण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच दिवशी कारंजा येथील बाल-भाऊ देवरस सरस्वती उच्चतर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहवासात समृद्धीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षणाबद्दलचा उत्साह आणि समाजसेवेची प्रेरणा हेच या वाढदिवसाचे खरे समाधान असल्याची भावना आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव शहरचे अध्यक्ष रोहित अग्रवाल, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालय परिवाराचे त्यांनी आभार मानले. समाजसेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले.1
- वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न! काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला. बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी चिमुरड्यांचे स्वागत केले. शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.2
- धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहर व तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहर पिवळ्या ध्वजांनी सजले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजे, बँजो, आकर्षक देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषमय वातावरण निर्माण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमाखदार शोभा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण धामणगांव रेल्वे शहर दुमदुमून गेले. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत-गाजत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह दिला. ही भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली. तेथे महाआरती व अभिवादनानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शांतता व शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण जयंती महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- भंडारा नगरपालिकेच्या कारभाराची काँग्रेसकडून पोलखोल? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रस्त्यांवरील खड्डे, घाणीचे साम्राज्य अन् शाळांमधील शिक्षकांची कमतरता भंडारा : भंडारा शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर आणि कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, शहरातील विविध नागरी समस्यांचे चित्र या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, तसेच नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. ‘नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल’ असा दावा करत काँग्रेसकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या भंडारा शहरात चर्चेचा विषय ठरला असून, व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे आता भंडारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सामाजिक न्याय विभाग ( श,प) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प ) यांचे आर्वीत भव्य भोजनदानाचे आयोजन आर्वी:-दिनांक एक जून 2026 रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांचे जयंतीच्या अनुषंगाने आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव राजपाल भगत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार विचाराचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते आर्वी शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ढोल ताशे सांस्कृतीक देखावे, लोकांचा जनसागर विविध प्रभागातून भव्य मिरवणूका निघाल्या होत्या यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते हजारो लोकांचा जनसागर जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर आला होता यावेळी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संयुक्तपणे आयोजित भोजनदान कार्यक्रमाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी व नागरिकांनी अत्यंत आनंदाने आस्वाद घेतला या कार्यक्रमा च्यायशस्वितेसाठी सौ भारती पोटफोडे महिला व बालकल्याण सभापती आर्वी नगरपरिषद, सौ रेखा वानखडे जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल, सोनू चिंधेकर, सोनिका गोधने, शिल्पा इखार, सोनाली जैन, महेश देवशोध, दिनेश रुद्रकार, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, वासुदेवराव सपकाळ, नितीन मिश्रा, सिद्धांत कळंबे, रवींद्र वानखडे, रशीद शेख, राहुल विरेकर, निखिल वानखडे, समीर शेख, गोलू रायकवार, यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा, चंद्रपूरसह अनेक तालुक्यांतील शेती, घरे, जनावरे, शेतबांध, रस्ते तसेच वर्धा व इरई नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.* आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे.1