ग्रामसेवकांकडून मृत्यू नोंदीवर सहीचा विलंब; पंचायत समितीसमोर आमरण उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे खामगाव: ग्राम नायदेवी (ता. खामगाव) येथील मृत्यू नोंदीच्या प्रस्तावावर गेल्या आठ महिन्यांपासून सही करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत भूमि मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र खंडारे यांनी पंचायत समिती कार्यालय खामगाव समोर आमरण उपोषण सुरू केले. सकाळी सुमारे ११.३० वाजतापासून महेंद्र खंडारे उपोषणास बसले होते. ग्राम नायदेवी येथील ग्रामसेवक सौ. वानखडे यांनी मृत्यू नोंदीच्या प्रस्तावावर दीर्घकाळ सही न केल्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या मागणीसंदर्भात लेखी पत्र देत कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने खंडारे यांनी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेतले.
ग्रामसेवकांकडून मृत्यू नोंदीवर सहीचा विलंब; पंचायत समितीसमोर आमरण उपोषण, लेखी आश्वासनानंतर मागे खामगाव: ग्राम नायदेवी (ता. खामगाव) येथील मृत्यू नोंदीच्या प्रस्तावावर गेल्या आठ महिन्यांपासून सही करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत भूमि मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र खंडारे यांनी पंचायत समिती कार्यालय खामगाव समोर आमरण उपोषण सुरू केले. सकाळी सुमारे ११.३० वाजतापासून महेंद्र खंडारे उपोषणास बसले होते. ग्राम नायदेवी येथील ग्रामसेवक सौ. वानखडे यांनी मृत्यू नोंदीच्या प्रस्तावावर दीर्घकाळ सही न केल्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या मागणीसंदर्भात लेखी पत्र देत कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने खंडारे यांनी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेतले.
- Post by Shivaji Bhosale1
- युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच1
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- #marathi#newsjalna#1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1