वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांना भावनिक निरोप फुलउमरी आश्रम शाळेत सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात; शिक्षककडून कार्याचा गौरव मानोरा प्रतिनिधी : वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, फुलउमरी येथे वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावनिक सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी. डी. खंडारे होते, तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मधुकर राठोड यांनी प्रदीर्घ सेवाकाळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व समर्पित कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवेमुळे शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शिक्षक जीवन सोनोने, उगले तसेच गजानन खंडारे यांनी मनोगत व्यक्त करताना राठोड यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. पुढील आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एम. एस. जाधव यांनी केले. शेवटी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मधुकर राठोड यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांना भावनिक निरोप फुलउमरी आश्रम शाळेत सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात; शिक्षककडून कार्याचा गौरव मानोरा प्रतिनिधी : वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, फुलउमरी येथे वसतीगृह कर्मचारी मधुकर राठोड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावनिक सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी. डी. खंडारे होते, तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मधुकर राठोड यांनी प्रदीर्घ सेवाकाळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व समर्पित कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवेमुळे शाळेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शिक्षक जीवन सोनोने, उगले तसेच गजानन खंडारे यांनी मनोगत व्यक्त करताना राठोड यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. पुढील आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एम. एस. जाधव यांनी केले. शेवटी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मधुकर राठोड यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. #Amravati #aashishyerekar1
- महापुरुषांचे फोटो कचरा सारखे पडले धुळखात वनोजा ग्रामपंचायत कार्यालयात हि आहे ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होत आहे कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि याकडे प्रशासनान का दुर्लक्ष करत आहे ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्य जीवन जगत आहो ज्या महामानवामुळे गावात ग्रामपंचायत. कायदा.संविधान. सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार स्वतंत्र दिले आशा महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत किती लाजवनारी बाब आहे तेही ग्रामपंचायत मध्ये यावर शासन कारवाई करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे1
- रोलर नाही… थेट बसच वापरली! आर्वी आगारातील धक्कादायक प्रकार; प्रश्न विचारताच व्यवस्थापकांची उद्धट भाषा?”1
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- अमरावतीत वाढत्या अवैध वाहतुकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; दोषी RTO निलंबनाची मागणी1
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालय रेकॉर्ड ग्रामसेवक साहेबांच्या घरी ग्रामपंचायत कार्यालय फक्त नावालाच ग्रामपंचायत वनोजा बाग येथील ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून दिसत नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आणुन देणार ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये रेकॉर्ड रजिस्टर असतात तरी कुठे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा गावात कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा बाग फक्त शोभेची वस्तू बनली आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती फलक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले नाहीत आणि नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये यायचं असेल तर ग्रामसेवक साहेब म्हणतात मला भेटायला अगोदर फोन करायचा अन्यथा नाही याकडे प्रशासनान लक्ष देईल का1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1