सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कुंभारी गाव दत्तक घेऊन विकास करु - मा. श्री. काकासाहेब कोयटे कोपरगाव /राजेंद्र तासकर : - केंद्रीयमंत्री मा. श्री. अमितजी शहा यांच्या नवीन सहकार धोरणानुसार प्रत्येक सहकारी संस्थांना पंचक्रोशितील कुठलेही गाव दत्तक घेऊन तेथील नागरिकांना अवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांसह पर्यटन स्थळांचा विकास करण्यात यावा अशी सूचना दिलेली असून, मा. श्री. अमितजी शहा यांच्या सूचनेचा आपण आदर करून राघवेश्वर सहकारी पतसंस्था कुंभारी आणि समता सहकारी पतसंस्था कोपरगाव या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून कुंभारी हे गाव दत्तक घेऊन ग्राम दत्तक योजने अंतर्गत गावचा सर्वांगिण विकास करू असे मत समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे यांनी नुकतेच अक्षय तृतीयेचे दिवशी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 921 व्या जयंतीनिमित्त कुंभारी येथे वीरशैव लिंगायत समाज स्मृतीस्थळ व महात्मा बसवेश्वर स्तंभ आणि उद्यानाचे फलक अनावरण प्रसंगी रविवार १९ एप्रिल २०२६ रोजी बोलतांना सांगितले. प्रारंभी समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक व कार्यक्रमाचे अध्यक्ष, लिंगायत समाज भूषण मा. श्री. काकासाहेब कोयटे, सौ. सुवासिनी कोयटे तसेच राघवेश्वर देवस्थान कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करुन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर उद्यान फलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढे बोलतांना श्री.काकासाहेब कोयटे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माननिय आशुतोषदादा काळे यांच्याशी दुरध्वनी मार्फत ग्राम दत्तक योजनेस आमदार निधी किंवा इतर निधी मिळणे संदर्भात माझी सखोल चर्चा झाली असून, यासंदर्भात त्यांनी आपल्याला ग्राम दत्तक योजनेस ग्रामविकास निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली. तद्पूर्वी ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार करावा. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरप्रसंगी आश्रमाचे मठाधिपती राघवेश्वरनंदगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, देवाधिदेव महादेव राघवेश्वराच्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये उत्तर दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कुंभारी नगरवासियांचे भाग्य थोर आहे की, राघवेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्र विकासात ग्रामदत्तक योजने अंतर्गत राघवेश्वर सहकारी पतसंस्था कुंभारी आणि समता सहकारी पतसंस्था कोपरगाव यांच्या माध्यमातून परिसर विकासात महात्मा बसवेश्वर महाराज उद्यानाची मोलाची भर पडणार असल्याने त्यांनी दोन्ही संस्थांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि श्री. व सौ. कोयटे यांचा व आदि मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी समता सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष मा. श्री. काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्षा सौ. सुवासिनी कोयटे, ग्रामपंचायत प्रथम महिला सरपंच सौ. देवयानी घुले, कुंभारी राघवेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. गोपीनाथभाऊ निळकंठ, माजी सरपंच व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा. श्री. प्रशांतजी घुले यांसह विविध संस्थांचे आजी - माजी चेअरमन, संचालक तसेच लिंगायत समाज बांधव - भगिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मा. श्री. गोपीनाथभाऊ निळकंठ यांनी मानले.

- Post by Changdev Barge1
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .1
- Post by Anand Gangurde4
- Post by Subhash Suryavanshi1
- नाशिक: दिंडोरी-निफाड येथे खासदार भास्कर भगरे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकारवर टीका केली. २०२३ मध्ये मंजूर झालेला ‘नारीशक्ती वंदन’ कायदा अद्याप लागू न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध असल्याचा आरोप त्यांनी फेटाळत, “आमचा कधीच विरोध नव्हता; केंद्राने तातडीने कायदा लागू करावा, आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. जनगणना व मतदारसंघ फेररचनेशी अंमलबजावणी जोडून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.1
- 👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को किसी भी प्रकार के दबाव दिया जाता है तो इसका जिम्मेवार मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!1
- येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.1