logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कर्तृत्वाचा केला गौरव; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे केले स्वागत चंद्रपूरच्या प्रगतीचा पाया पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनामुळेच भक्कम आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रपुरात नागरी सत्कार सोहळा उत्साहात साजरा चंद्रपूर : ‘प्रशासन जोपर्यंत पारदर्शी, लोकाभिमुख आणि सक्षम होत नाही, तोपर्यंत जिल्ह्याची प्रगती शक्य नसते. चंद्रपूर जिल्ह्याने यासंदर्भात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पारदर्शी, लोकाभिमुख आणि सक्षम प्रशासन हाच चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीचा भक्कम पाया ठरला आहे,’ असा विश्वास व्यक्त करत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाचा गौरव केला. अक्षय तृतीयेच्या पावन मुहूर्तावर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी जी. सी. विनय गौडा यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. तर त्याचवेळी नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांनी आपल्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे आयाम दिले. विविध विकास प्रकल्पांना गती देताना त्यांनी प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार दिली. विशेषतः आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या विकासकामांना त्यांनी दिलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला वेग मिळाला. त्यामुळेच त्यांच्या कार्याची छाप नागरिकांच्या मनात अढळ राहिली असून, त्यांच्या सन्मानार्थ चंद्रपूरकरांनी मोठ्या कृतज्ञतेने हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलंकीत सिंह, मनपा आयुक्त अकनूरी नरेश, पोलिस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, माजी आमदार अतुल देशकर, राजेंद्र गांधी, राहुल पावडे, प्रकाश धारणे, मंगेश गुलवाडे, विशाल निंबाळकर, नम्रता ठेमस्कर, बंडू गौरकर, पुरोषोत्तम सहारे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, धनराज कोवे, सत्यम गाणार, चांद सय्यद, सिकंदर शेख, छबुताई वैरागडे, अंजली घोटेकर, रवी लोणकर, शुभम गेडाम, श्रीकांत आंबेकर, आकाश मस्के, सचिन यामावार, मनीषा ठुणेकर, मुग्धा खंडे, कुणाल गुंडावार, सचिन कोतपल्लिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अक्षय तृतीया म्हणजे केवळ सोने खरेदी न करता ‘सोन्यासारखं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान’ करणे देखील आहे. विनय म्हणजेच नम्रता, शिस्त आणि आदर, या गुणांचा संगम जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कार्यशैलीत दिसून आला,’ असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्याने राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, यामागे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर’सारख्या उपक्रमांतून हजारो कोटींची गुंतवणूक चंद्रपुरात आली, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी दूरदृष्टीने काम केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. प्रशासनात शांतता, संयम आणि निर्णयक्षमतेचा आदर्श त्यांनी घालून दिला, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे स्वागत करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण शब्दांत भावना व्यक्त केल्या. ‘वसु म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर गुणांची श्रीमंती,’ असे सांगत त्यांनी वसुमना पंत यांच्या नेतृत्वातून चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा आणि अधिक उंची लाभेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ‘एक सक्षम अधिकारी जातो आहे आणि दुसरा सक्षम अधिकारी येतो आहे, हीच जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे,’ असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले. ‘उत्तम काम करणाऱ्यांना समाजाची शाबासकी हीच सर्वात मोठी ऊर्जा असते,’ असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा गौरव केला.

6 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
65ae2aa6-77bb-4df0-993e-70d910afeb01

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    1
    🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात
🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च
🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश 
___________
पाटनबोरी :  शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. 
अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे.  ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. 
भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. 
जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    3
    कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! 
अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… 
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे…
नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत…
इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे…
सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे!
स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    1
    बकरी करते मिरचीची दंडीकट !
भिवापूर । उमरेड
सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे.
सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur
    1
    मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है
#viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नागपूरच्या जिल्हा परिषद समोर रज्जु परिपगार आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार महाराष्ट्रातील 48 कर्मचारी सात महिन्यापासून मानधनापासून वंचित नागपुर न्यूज़ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण अधिकारी वर्ग ऐैकत नाही ! असा आरोप सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत लावला -रज्जु परिपगार महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील योजना ही 2017 पासून सुरू झाली. परंतु 6 सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय जीआर निघाला की, महिला बाल विकास विभाग योजनेत हस्तांतरण करण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून योजना अंमलात आली. 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मनुष्यबळ मंजूर झालेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यानुसार 2023 मध्ये मनुष्यबळ राहणार नाही असे सुद्धा नमूद केले होते. राज्य शासनाने गेल्या 7 महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले आहे म्हणून आरोग्य विभागाचे उदासीन धोरणामुळे मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, येथे दाद मागितली. माननीय उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 च्या कोर्ट आदेशानुसार समायोजन करावे. आणि 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून अधिकारी वर्गांना आदेश दिला व सांगितले. परंतु अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप रज्जु परिपगार यांनी पत्र परिषदेत लावला. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्वांना 7 महिन्याचा पगार देणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करणार ! असे पत्रकारांना सांगितले. मा. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सचिव समावेश समायोजन करावेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर हैद्राबाद हाऊस सचिवालयात आशा पठाण यांना पत्र दिले. केंद्रीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संदीप जोशी या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु आम्हाला न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव घ्यावी लागली. कारण आम्ही आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करू, कसे जगू, यासाठी हक्काचा पगार आम्हाला मिळावा व कार्यादेश देण्यात यावा. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी करीत आहे की, आमचा सात महिन्याचा पगार देण्यात यावा व कार्यादेश द्यावा असे सांगितले. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि कॉस्ट्राईबचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, रज्जू परिपगार, पौर्णिमा गजभिये, संगीता वासेवार, निता दांडेकर, निलेश अडुळकर, कैलास खांडेकर आणि प्रिती मेश्राम यांची उपस्थिती होती.
    1
    नागपूरच्या जिल्हा परिषद समोर रज्जु परिपगार आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार
महाराष्ट्रातील 48 कर्मचारी सात महिन्यापासून मानधनापासून वंचित
नागपुर न्यूज़ 
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण अधिकारी वर्ग ऐैकत नाही ! असा आरोप सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत लावला -रज्जु परिपगार
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील योजना ही 2017 पासून सुरू झाली.
परंतु 6 सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय जीआर निघाला की, महिला बाल विकास विभाग योजनेत हस्तांतरण करण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून योजना अंमलात आली.
2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मनुष्यबळ मंजूर झालेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यानुसार 2023 मध्ये मनुष्यबळ राहणार नाही असे सुद्धा नमूद केले होते.
राज्य शासनाने गेल्या 7 महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले आहे म्हणून आरोग्य विभागाचे उदासीन धोरणामुळे मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, येथे दाद मागितली. माननीय उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 च्या कोर्ट आदेशानुसार समायोजन करावे.
आणि 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून अधिकारी वर्गांना आदेश दिला व सांगितले. 
परंतु अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप रज्जु परिपगार यांनी पत्र परिषदेत लावला. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्वांना 7 महिन्याचा पगार देणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करणार ! असे पत्रकारांना सांगितले.
मा. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सचिव समावेश समायोजन करावेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर हैद्राबाद हाऊस सचिवालयात आशा पठाण यांना पत्र दिले. केंद्रीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संदीप जोशी या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु आम्हाला न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव घ्यावी लागली.
कारण आम्ही आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करू, कसे जगू, यासाठी हक्काचा पगार आम्हाला मिळावा व कार्यादेश देण्यात यावा. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी करीत आहे की, आमचा सात महिन्याचा पगार देण्यात यावा व कार्यादेश द्यावा असे सांगितले. 
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि कॉस्ट्राईबचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, रज्जू परिपगार, पौर्णिमा गजभिये, संगीता वासेवार, निता दांडेकर, निलेश अडुळकर, कैलास खांडेकर आणि प्रिती मेश्राम यांची उपस्थिती होती.
    user_Kranti Surya Jyothi news wardha
    Kranti Surya Jyothi news wardha
    Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती
    1
    नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित
नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.