logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश लागु: जिल्हाधिकारी नांदेड नांदेड दि. 10 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

on 11 April
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
on 11 April
280b564b-148c-40d5-b858-44cddfe8cca1

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश लागु: जिल्हाधिकारी नांदेड नांदेड दि. 10 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • वाशिम शहर दनाणून गेले वाशिम जिल्हा द्वारा दि 28 एप्रिल रोजी वाशिम येथिल मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे
    5
    वाशिम शहर दनाणून गेले 
वाशिम जिल्हा द्वारा दि 28  एप्रिल रोजी वाशिम येथिल  मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    49 min ago
  • मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    1
    मी भाजपाचा साधा सदस्य सुद्धा नाही, संघ परीवारच कुठल दायीत्व माझ्याकडे नाही असे सांगत स्वत: किशोर शिवणीकर यांनी भाजपा संबंधाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    4
    माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला 
उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये.
त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. 
मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. 
कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. 
अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
    1
    • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना
लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • जाहीर अवाहन... जाहीर अवाहन... ​उदगीर शहरातील सर्व नागरिकांना, ​आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. ​या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे. ​माझे आपणास नम्र आवाहन आहे की, ​आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी. ​या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. ​अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे. ​चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया! ​आपले नम्र सौ. स्वातीताई सचिन हुडे नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद ​ ​हेडलाइन
    1
    जाहीर अवाहन... जाहीर अवाहन...
​उदगीर शहरातील सर्व नागरिकांना,
​आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
​या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे.
​माझे आपणास नम्र आवाहन आहे की,
​आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी.
​या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे.
​अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे.
​चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया!
​आपले नम्र
सौ. स्वातीताई सचिन हुडे
नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद
​
​हेडलाइन
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.