Shuru
Apke Nagar Ki App…
गॅस टंचाई अनेक ठिकाणी गॅस विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक सिलेंडर कधी मिळणार ? पुणे जिल्हा व महाराष्ट्र भर जोरदार घोषणांनी दणाणले. . पत्रकार: . विजय बगाडे
Vijay Bagade
गॅस टंचाई अनेक ठिकाणी गॅस विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक सिलेंडर कधी मिळणार ? पुणे जिल्हा व महाराष्ट्र भर जोरदार घोषणांनी दणाणले. . पत्रकार: . विजय बगाडे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड : - शहरातील वेताळ नगर परिसरात काही तरुणांनी टोकाचे खोडसाळ कृत्य करत एका बांधकाम साईटवर साहित्याची मोठी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, वेताळ नगरमधील एका नियोजित इमारतीच्या बांधकाम साईटवर ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास काही तरुणांच्या टोळक्याने परिसरात प्रवेश केला. कोणत्याही कारणाशिवाय या तरुणांनी तिथे असलेले बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर साधनांची तोडफोड केली. यामध्ये विकासकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंचवड परिसरात तरुणांच्या टोळक्यांकडून अशा प्रकारचे उपद्रव वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भरवस्तीत अशा प्रकारे तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही अस्वस्थता असून, संबंधित समाजकंटकांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत... #चिंचवड #वेताळनगर #पिंपरीचिंचवड #गुंडागर्दी #तोडफोड #बांधकामसाईट #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #स्थानिकबातम्या #सुरक्षा #सीसीटीव्ही #नागरिकसंताप #महाराष्ट्रन्यूज #Chinchwad #VetalNagar #PimpriChinchwad #Vandalism #Hooliganism #ConstructionSite #CrimeNews #PoliceAction #LocalNews #PublicSafety #CCTV #ResidentsAngry #MaharashtraNews1
- पुणे: न-हे गावातील ‘स्वर्ग’ लॉजवर पोलिसांचा छापा; ४ महिलांची सुटका, ३ आरोपी अटकेत. लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड.1
- पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.1
- _विक्रम शिंदे (भोर दि 6 )हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंचा ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष_ *पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे धर्मांधांचे षडयंत्र हाणून पाडा !* - आमदार टी. राजा सिंह *हडपसर (जिल्हा पुणे)* - हडपसरसारख्या भागात गोहत्या करणारे धर्मांध पोलिसांसमोरच गोरक्षकांना चोप देत आहेत आणि धर्मांध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दगडफेक करत आहेत. स्थिती अशीच राहिली, तर हिंदूंच्या मुलांचे भवितव्य अंध:कारमय आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे षडयंत्र हिंदूंनी जागरूक राहून हाणून पाडले पाहिजे. हिंदूंमध्ये सुप्त झालेले क्षात्रतेज त्यांना आता जागृत करावे लागेल, असे आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी केले. ते ५ एप्रिल या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदूंच्या संघटिपणाचा अविष्कार दाखवून दिला. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली! प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित श्री. प्रीतम तिखेगुरुजी आणि पुरोहित श्री. अरुण भिसेगावकर गुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले, तर समितीच्या कार्याच्या परिचय श्री. पराग गोखले यांनी करून दिला. या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. *‘मायनॉरिटी फंड’ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरा ! - आमदार टी. राजासिंह* या प्रसंगी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘यापुढील काळात हिंदूंनी जातींमध्ये विभाजित न रहाता ‘मी हिंदू’ आहे या भावनेने एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यांची विचारसरणी ‘गजवा-ए-हिंद’ची आहे, त्यांना हिंदूंना पैसा का म्हणून द्यावा. त्यामुळे धर्मांध-जिहादी यांच्याकडून कोणतीही खरेदी करू नका. धर्मांधांची आर्थिक रसद कापली, तर ‘लव्ह जिहाद’ ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराची विषवल्ली आपोआप नष्ट होईल. हिंदूंच्या घामाचा पैसा ‘मायनॉरिटी फंड’च्या नावाने अल्पसंख्यांकांवर उधळला जात आहे. हा निधी तात्काळ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा, अशी आमची मागणी आहे.’’ *हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था* हिंदुत्वामुळे देश पिछाडीवर जाईल असा अपप्रचार केला जातो; मात्र हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. असे असले, तरी २ दशकांपूर्वी जिहादी आतंकवाद लपवण्यासाठी हिंदु आतंकवाद, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे एक ‘टूलकिट’ होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट, मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. याच प्रकारे सनातनचे साधक समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर यांचा तपास यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली बदनामी यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यामुळे त्यांचे झालेले निधन हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. याला हिंदूंनी विरोध केला पाहिजे! *हिंदूंची श्रद्धास्थाने, मंदिरे यांना अपवित्र करणार्या धर्मांधांना प्रतिबंधित करा ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती* पुणे शहरात पुरंदर भागात ‘लँड जिहाद’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक मंदिरांमध्ये मूर्तीची विटंबना होत असून या घटना दडपण्याठी पोलीस धर्मांध आरोपींना माथेफिरू ठरवत आहेत. प्रत्येक घटनेत आरोपी ‘माथेफिरू’, कसा असू शकेल? तरी मंदिरांच्या संदर्भात वारंवार घडणार्या या घटनांमागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलीस अनेक घटनांमध्ये जीवावर उदार होऊन गोरक्षण करणार्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करून कसायांना मात्र मोकाट सोडत आहे, अशा अनेक तक्रार यापुढील काळात असे प्रकार होता कामा नयेत. पुण्यातील हिंदूंची मंदिरे, सारसबागेत होणारी धर्मांधांची घुसखोरी यांसह अनेक ठिकाणी धर्मांधांची मुजोरी वाढत आहे. तरी धर्मांधांच्या वाढत्या कारवाया रोखून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर येण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा यांसाठी, तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी येणार्या १५ दिवसांत एक भव्य आंदोलन घेण्यात येणार आहे. प्रत्येक शहर, गाव येथील बांगलादेशी घुसखोर शोधणे आवश्यक असून या मोहिमेला गती येण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याचा ठराव होणे आवश्यक आहे.’’ *उपस्थित मान्यवर* - माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, भाजप पुणे कँटोन्मेंटचे सरचिटणीस श्री. समीर शेंडकर, भाजप नगरसेवक श्री. मारुति (आबा) तुपे, भाजप नगरसेवक श्री. राजेंद्र काशिनाथ भिताडे, भाजप नगरसेविका सौ. उज्वला जंगले, भाजप नगरसेविका सौ. प्राची अल्हाट, भाजप पुणे सरचिटणीस श्री. बाळासाहेब घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल, शिवसेना नगरसेविका सौ. मोनिका निलेश पवार, शिवसेनेचे नगरसेवक श्री. गणेश कामठे, उरळी देवाची येथील शिवसेना नगरसेविका शारदा भैरु भाडळे (माई) प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक सणस, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कल्पना धनंजय हांडे, सौ. सुवर्णा खर्चे, उद्योजक श्री. कृष्णानंद नाईक, हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र घुले, ह. भ. प. तुषार महाराज चौधरी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चौरघे महाराज *संत* - पू. पप्पाजी पुराणिक, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनिषा पाठक आणि पू. (सौ.) अंजली करंबेळकर, आदरणीय सौ. सरस्वती अमृतकरताई, ‘वेद वासुदेव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अजित तुकदेव *विशेष* १. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सनातनच्या ‘विवाहसंस्कार - शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’ आणि ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’ या ग्रंथांच्या मराठी भाषेतील ‘ऑनलाईन’ आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. २. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी आमदार टी. राजा सिंह यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र भेट दिले. *हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणार्या धर्मवीरांचा सत्कार - १८ सहस्रपेक्षा अधिक गोवंशांना जीवदान देणारे श्री. ऋषिकेश कामथे यांचा आमदार टी. राजा सिंह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- परंडा नगर परिषदेमध्ये पाण्यासाठी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर यांचा जनशक्ती विकास आघाडीच्या सदस्यावर हल्लाबोल1
- 🏍️🛵सातारा शहरातील वाढती वाहतूक बेशिस्त — नागरिकांनी आता शहाणपणाने वागण्याची वेळ!🚙🚗 सातारा शहर आज झपाट्याने विकसित होत असताना एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब समोर येत आहे — वाहतुकीतील वाढती बेशिस्त. टू-व्हीलर असो, फोर-व्हीलर असो किंवा इतर कोणतेही वाहन, अनेक चालक नियमांकडे सरळसरळ दुर्लक्ष करत आहेत. रस्त्यावर वाकडी-तिकडी गाडी चालवणे, सिग्नल न पाळणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, आणि इतर वाहनचालकांना विनाकारण त्रास देणे — हे प्रकार आता रोजचेच झाले आहेत. ही परिस्थिती फक्त गैरसोयीची नाही, तर अत्यंत धोकादायक आहे. एका चालकाची निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो, याची जाणीव अनेकांना राहिलेली दिसत नाही. “मला काय फरक पडतो?” ही मानसिकता आता बदलली पाहिजे. कारण रस्ता हा कोणाच्याही बापाचा नाही — तो सर्वांसाठी समान आहे, आणि तिथे नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जर हाच प्रकार Mumbai किंवा Pune सारख्या शहरांमध्ये घडला असता, तर वाहतूक विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणात दंड (चलान) आकारले असते की संबंधित चालकांना आर्थिक फटका बसला असता. तिथे नियम मोडणे म्हणजे थेट दंड आणि कारवाई — त्यामुळे लोक तिथे शिस्त पाळतात. मग साताऱ्यातच का नियम मोडण्याची सवय? विशेषतः काही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत: 🔴कुठेही गाडी थांबवून रस्ता अडवणे 🔴रस्त्याच्या मधोमध उभे राहून खरेदी करणे 🔴पार्किंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे 🔴हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरणे 🔴ओव्हरस्पीडिंग आणि बेदरकार ड्रायव्हिंग ही केवळ चूक नाही, तर समाजाविरोधात केलेला अपराध आहे. साताऱ्यातील प्रत्येक नागरिकाने आता जबाबदारीने वागले पाहिजे. वाहन चालवताना सतर्कता बाळगणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे — ही केवळ अपेक्षा नाही, तर कर्तव्य आहे. प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहून कडक कारवाई करणे गरजेचे आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन, आणि आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे. शेवटी एकच स्पष्ट संदेश — “वाहतुकीत बेशिस्त म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ!” आता तरी सुधरा, नियम पाळा, आणि साताऱ्याला एक शिस्तबद्ध, सुरक्षित शहर बनवण्यासाठी आपला सहभाग नोंदवा. 🚦 #सातारा_वाहतूक_बेशिस्त #SataraTraffic #FollowTrafficRules #DriveSafeStaySafe #रस्ता_सर्वांसाठी #NoParkingAnywhere #TrafficDiscipline #HelmetIsMust #SeatbeltSavesLives #SafeDriving #BeResponsible #StopRecklessDriving #RespectTrafficRules #RoadSafetyFirst #AlertDrivers #सुरक्षित_सातारा1
- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत असून देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नाव नोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्ष यांचेकडे करावी. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, "गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत." बाईट - राजा माने, राष्ट्रीय अध्यक्ष बाईट - अनिल पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष5
- Post by Dr krishna karade1