नातेसंबंधाला काळीमा!* *अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला २० वर्षे सक्तमजुरी* *नातेसंबंधाला काळीमा!* *अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला २० वर्षे सक्तमजुरी* रिसोड वाशिम, नातेसंबंधाचा गैरफायदा घेत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, या गंभीर गुन्ह्यात मंगरुळपीर येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती पी. एस. काळे यांच्या न्यायालयाने आरोपी याला रा. येडशी कुंड, ता. मंगरुळपीर) (आम्ही कायदेशीर बाबी मुळे आरोपीचे नावाचा उल्लेख टाळला आहे. कारण आरोपीचे नाव घेतल्यास मुलीची ओळख पटू नये यासाठी आम्ही नाव घेऊ शकत नाही) आरोपी याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला 'बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण' (पोक्सो) कायद्यांतर्गत २० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. *घटना आणि प्रकरणाची पार्श्वभूमी* प्राप्त माहितीनुसार, आरोपी काका हा पीडितेच्या कौटुंबिक नात्यातील (मावशीचा पती) आहे. जून २०२१ मध्ये टाळेबंदीच्या काळात तो आपल्या कुटुंबासह पीडितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. दिनांक ०२ जुलै २०२१ रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास, पीडितेचे पालक शेतात गेले असताना, आरोपीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीला गाडीत फिरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन पीडितेलाही पालकांच्या संमतीशिवाय सोबत घेतले आणि थेट पुण्याकडे पळवून नेले. आरोपीने पीडितेला पुण्यातील हिंजवडी भागातील एका खोलीत नेऊन ठेवले. तेथे त्याने तिच्यावर दबाव आणून लैंगिक अत्याचार केला आणि लग्नासाठी सक्ती केली. पीडितेने लग्नास स्पष्ट नकार देऊन घरी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आरोपीने तिला ०६ जुलै २०२१ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर आणून सोडले आणि पळ काढला. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने पीडितेच्या वडिलांनी ०५ जुलै २०२१ रोजी मनोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडिता घरी परतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार समोर आला आणि पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. *पोलीस तपास आणि न्यायालयीन कामकाज* मनोरा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन निवृत्ती शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास चक्रे फिरवली. त्यांनी तात्काळ पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेतली, घटनास्थळाचा पंचनामा तयार केला आणि मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा कलम १६४ अन्वये जबाब नोंदवला. वयाचा पुरावा (शालेय दाखला) आणि वैद्यकीय अहवाल गोळा करून ०६ सप्टेंबर २०२१ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात चाललेल्या खटल्यात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी वकील ॲड. एस. के. गिमेकर यांनी मांडलेला युक्तिवाद, पीडिता व पालकांची साक्ष, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश राठोड यांची वैद्यकीय साक्ष आणि तपास अधिकारी पी.एस.आय. गजानन शिंदे यांनी सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षेची सुनावणी केली. *न्यायालयाचा अंतिम निर्णय व शिक्षेचा तपशील* १. **पोक्सो कायदा (POCSO Act) कलम ४, ५ सह ६:** २० वर्षे सक्तमजुरी आणि ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद). २. **भारतीय दंड विधान (IPC) कलम ३६६ (पळवून नेणे/अपहरण):** ५ वर्षे साधी कैद आणि ३,००० रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने साधी कैद). ३. **भारतीय दंड विधान (IPC) कलम ३६३ (अपहरण):** ३ वर्षे साधी कैद आणि १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधी कैद). ४. **पीडितेला मदत:** वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेपैकी ७,००० रुपये पीडित मुलीस भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व शिक्षा एकाच वेळी (Concurrently) चालणार आहेत. तसेच, कायदेशीर तरतुदीनुसार आणि पोक्सो कायद्याच्या कलम २३ नुसार पीडित मुलीची ओळख गोपनीय राखण्यात आली आहे.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती प्रशासनावर नाराज1
- बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद मध्ये पावसाचा कहर अनेक शेती पिके व महामार्ग पाण्याखाली पुरस्थीती कायम1