Shuru
Apke Nagar Ki App…
आजारपणाला कंटाळून वाघळी धरणाजवळ वृद्धाची गळफास लावून आत्महत्या खामगाव : तालुक्यातील वाघळी शिवारातील धरणाजवळ एका ८२ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ मार्च सायंकाळपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम १९४ बी.एन.एस.एस. अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर मारोती करांगळे (८२) रा. गोंधनापुर, ता. खामगाव असे आहे. फिर्यादी विजय शालीग्राम खंडारे (४९) व्यवसाय शेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, करांगळे हे मागील काही वर्षांपासून पोटदुखी व दम्याच्या आजाराने त्रस्त होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी बाघळी येथील धरणाच्या काठावरील निचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Shivaji Bhosale
आजारपणाला कंटाळून वाघळी धरणाजवळ वृद्धाची गळफास लावून आत्महत्या खामगाव : तालुक्यातील वाघळी शिवारातील धरणाजवळ एका ८२ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ३१ मार्च सायंकाळपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम १९४ बी.एन.एस.एस. अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर मारोती करांगळे (८२) रा. गोंधनापुर, ता. खामगाव असे आहे. फिर्यादी विजय शालीग्राम खंडारे (४९) व्यवसाय शेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, करांगळे हे मागील काही वर्षांपासून पोटदुखी व दम्याच्या आजाराने त्रस्त होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी बाघळी येथील धरणाच्या काठावरील निचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1
- *खामगाव तालुक्यात रेती माफियांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवून दिली आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या थेट तहसीलदारांच्याच अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेखामगाव-नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात ही घटना घडली. तहसीलदार सुनील पाटील हे आपल्या खाजगी वाहनाने या परिसरात गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणारे एक वाहन (क्रमांक MH 30 BD 7374) दिसून आले.जेव्हा तहसीलदारांनी या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, तेव्हा चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती थेट तहसीलदारांच्या अंगावर घालून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसीलदार पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाया माफियाला सोडायचे नाही या जिद्दीने तहसीलदारांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरावरच त्यांनी या वाहनाला घेराव घालून पकडले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मी स्वतः खाजगी वाहनाने पाठलाग केला असता एका हायवा चालकाने मला चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हायवेवरून त्याने युटर्न घेऊन धोकादायक पद्धतीने वाहन चालवले. आम्ही या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि फौजदारी कलमान्वये कारवाई प्रस्तावित केली आहे."1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील कॉटन जिनिंग मध्ये विश्वास संपादित करत पर राज्यातील दोघांनी 96 लाखाची 420 करून कॉटन जिनिंग मालकाची 96 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे सदरील कॉटन जिनिंग मॅनेजर ने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे1
- Post by Shivaji Bhosale1
- भोंदु बाबा व नागरिक , भोंदु बाबांना आरती म्हणता येत नाही.. भोंदु महाराज खेड तालुक्यातील घटना ...1
- बुलढाणा जिल्ह्याचे वैभव आणि चिखली शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री रेणुका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला आहे. आज पहाटे पारंपरिक विधीवत पूजा आणि घटस्थापनेने या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झाली. २ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात यंदा भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या चिखली नगरीत आजपासून नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. पहाटेच्या मंगल मुहूर्तावर रेणुका माता संस्थानच्या वतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. आईच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.यंदाचा नवरात्रोत्सव विशेष ठरणार आहे. संस्थानच्या वतीने २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी महापूजा, अभिषेक, दुपारी आरती आणि सायंकाळी विविध भजनांचे कार्यक्रम रंगणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.उत्सव कालावधी | १० दिवस (समाप्ती २ एप्रिल) | | मुख्य विधी | घटस्थापना, महापूजा, अखंड दीप प्रज्वलन | | विशेष आयोजन | भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचने | | भक्त सोय | महाप्रसाद आणि दर्शन रांगेचे नियोजन चिखलीचे हे शक्तिपीठ केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान आहे. येत्या नऊ दिवसांत याठिकाणी श्रद्धेचा मोठा महाकुंभ भरणार असून, प्रशासनानेही या गर्दीचे नियोजन करण्यासाठी कंबर कसली आहे.1