आमदार सुरेश धस यांनी सभागृहात उपस्थित केला घटत्या लिंग गुणोत्तराचा गंभीर प्रश्न... ----------- पाटोदा (प्रतिनिधी) :- “ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये जवळपास १५० तरुण लग्नासाठी तयार आहेत; पण मुली मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे सांगत बीड जिल्ह्यातील घटत्या लिंग गुणोत्तराचा धोकादायक प्रश्न आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात ठामपणे उपस्थित केला. बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण अत्यंत चिंताजनकरीत्या घसरले होते. १००० पुरुषांमागे केवळ ६२८ मुली इतके कमी प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात कमी असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, मुलींच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात सामाजिक संकट निर्माण होत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने तरुण लग्नासाठी तयार असतानाही त्यांना वधू मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातून मुली आणून विवाह लावून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा या व्यवहारांमध्ये फसवणूक होऊन अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणेही समोर येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात कठोरपणे होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी सुरुवातीपासून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. तसेच वर्षाताई देशपांडे आणि उपसभापती नीलमताई यांनी बीड जिल्ह्यात येऊन विशेषतः ऊसतोड कामगार महिलांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून या विषयावर अभ्यास केला होता, याचाही उल्लेख आमदार धस यांनी केला. समाजामध्ये मुलगी नकोशी अशी मानसिकता निर्माण झाल्यामुळे लिंग गुणोत्तर चिंताजनक पातळीपर्यंत घसरले होते. मात्र शासन, सामाजिक संघटना आणि जनजागृतीमुळे आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी देखील हा विषय सभागृहात मांडला होता. मात्र त्या वेळी तो विषय विनोदाने घेतला गेला असल्याचे दिसले, असे नमूद करत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले की ग्रामीण भागात हा प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने यावर तातडीने कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची गरज आहे.

- Balu MaskeBeed, Maharashtra🙏on 16 March
- Balu MaskeBeed, Maharashtra🙏on 16 March
- अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई : आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय १९) याच्यावर १८० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. प्रशासनाची कडक कारवाई अचलपूर नगर परिषद च्या पथकाने पोलिस बंदोबस्तात आरोपीच्या घरावरील अवैध बांधकामावर कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने घराचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तसेच लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.1
- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक) हे प्रत्यक्षात मुख्यालयी वास्तव्यास आहेत की नाही, तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या भाडे भत्त्याबाबत (HRA) मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड, मंठा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मंठा यांना सविस्तर निवेदन सादर करून आठ दिवसांत संपूर्ण माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. यामागील उद्देश म्हणजे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे, नागरिकांना त्वरित सेवा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज प्रभावीपणे चालवणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी असून, तरीही ते शासनाकडून भाडे भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, संबंधित अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास असल्याचे दर्शविण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून त्याची सत्यप्रत (प्रोसिडिंग) पंचायत समितीकडे सादर करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा संशय व्यक्त करत, या सर्व कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे मंठा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी अहवाल देणे, संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या भाडे भत्त्याची कालावधीसह सविस्तर माहिती जाहीर करणे, तसेच जे अधिकारी प्रत्यक्षात मुख्यालयी राहत नसूनही भाडे भत्ता घेत आहेत अशा प्रकरणांची चौकशी करून त्यावर केलेली किंवा होणारी कारवाई स्पष्ट करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ही माहिती नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असून प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत संपूर्ण व अचूक माहिती उपलब्ध करून न दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.1
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- 🚨 महत्त्वाचे आवाहन: वाढत्या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करा! 🚨 जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने वाढ होत असून, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ✅ नागरिकांनी काय काळजी घ्यावी? 🧢 उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधा किंवा टोपीचा आवर्जून वापर करा. 💧 शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, ताक किंवा इतर द्रवपदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. 👨🌾 विशेष लक्ष द्या: गरोदर माता, शेतकरी, कामगार आणि आजारी व्यक्तींनी वाढत्या उन्हाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 🏥 प्रशासनाची तयारी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH) आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (SDH) 'कूल रूम्स' (Cool Rooms) तयार करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ⚠️ लक्षात ठेवा : उष्णतेच्या लाटेमुळे (Heatwave) कोणताही त्रास किंवा लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या! ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा. #Ahilyanagar #HeatwaveAlert #SummerSafety #CollectorAppeal #StayHydrated #Maharashtra #DrPankajAshiya #PublicHealth #StayCool1
- माकड हाकलताना ३३ केवी लाईनचा करंट, क्षणातच झाला दुर्दैवी अंत ! छतरपूर (मध्य प्रदेश) मधील बमीठा पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रूम बॉयचा करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रदीप रैकवार उर्फ रानू रैकवार हे लोखंडी पाइपने माकड हाकलत असताना अचानक ३३ केवी वीज लाईनच्या संपर्कात आले. जोरदार विद्युत धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1