logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वयंपाकघरातील सिलिंडरला लागली आग; ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला मानोरा : तालुक्यातील सेवादास नगर येथे ७ मार्च रोजी सायंकाळी अचानक गॅस सिलिंडरला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सेवादास नगर येथील रहिवासी श्रीचंद गुलाब राठोड यांच्या घरातील स्वयंपाकघरात सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केल्याने घरातील कपडे, किराणा सामान व इतर साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पाणी तसेच इतर साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. या आगीत सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पीडित कुटुंबाने शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

23 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
23 hrs ago
2ad19f9a-09ce-45a5-99a9-c9ebba1bab48

स्वयंपाकघरातील सिलिंडरला लागली आग; ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला मानोरा : तालुक्यातील सेवादास नगर येथे ७ मार्च रोजी सायंकाळी अचानक गॅस सिलिंडरला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. मात्र ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, सेवादास नगर येथील रहिवासी श्रीचंद गुलाब राठोड यांच्या घरातील स्वयंपाकघरात सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केल्याने घरातील कपडे, किराणा सामान व इतर साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पाणी तसेच इतर साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. या आगीत सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पीडित कुटुंबाने शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
    1
    दारव्हा  तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    1 hr ago
  • जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    1
    जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    1 hr ago
  • शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    1
    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    2
    विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण 
उमरखेड :-PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करून  काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अद्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का? विश्वासघात करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही होईल का? याकडे उपोषणकर्त्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये नगर परीषदेच्या वतीने सन्मान सोहळा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर परीषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी राजु घोडके यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.
    1
    जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये नगर परीषदेच्या वतीने सन्मान सोहळा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर परीषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याधिकारी राजु घोडके यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.