तहसील कार्यालय परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात; कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा मानोरा : तहसील कार्यालय परिसरात नकाशा प्रमाणे असलेल्या मोकळ्या जागेवर विविध प्रकारची अतिक्रमणे वाढत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून परिसर मोकळा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी १० मार्च मानोरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तहसील कार्यालय परिसर हा नागरिकांच्या विविध शासकीय कामकाजासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मात्र परिसरात अनधिकृत अतिक्रमणे वाढत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणामुळे शासकीय जागेचा वापरही मर्यादित होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तहसील कार्यालय परिसराची नकाशा प्रमाणे पाहणी करून सर्व प्रकारची अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सभापती डॉ. संजय रोठे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योतीताई गणेशपुरे, मोह. सलीम, विरू राठोड, गणेश पिंगाणे, राजू उरकडे, प्रकाश करवते, मो. आरिफ, अनिल चव्हाण, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते. फोटो

- दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.1
- Post by Sharad Dayedar1
- बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- Post by वैजनाथ पावडे1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- Post by स्मिता तलेय1
- Post by Nandkumar Motiram Totewad1