logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नेर नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाने चार शिक्षकांच्या प्रशासकीय समायोजनाचे आदेश काढल्यानंतर नगरपरिषदेत नवा वाद उफाळला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले असले तरी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांना विश्वासात न घेताच ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या समायोजनांतर्गत अलका राऊत, शितल राठोड, प्रमिला जीवने आणि विद्या गजभिये या चार शिक्षकांचे विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या, मंजूर पदे, रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षकांचा आढावा घेऊन शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राहावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता भासू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणे आवश्यक असताना, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. शिक्षक समायोजनासारख्या संवेदनशील विषयावर एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे आगामी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत हा विषय गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या मतांना डावलून प्रशासन निर्णय घेत असल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा महत्त्वाच्या विषयांवर सामूहिक चर्चा होण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे शिक्षक समायोजनाचा विषय आता केवळ शैक्षणिक न राहता राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरत आहे. नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुनिता जयस्वाल यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "शिक्षक समायोजनाचा निर्णय नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात घेऊन करायचा होता. मात्र मुख्याधिकारी यांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. यामुळे आमचा या प्रक्रियेवर आक्षेप आहे."

1 hr ago
user_Nilesh Wanjari
Nilesh Wanjari
नेर, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago
5fa83f27-400a-4a6b-92f9-3d92c4b3a64c

नेर नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाने चार शिक्षकांच्या प्रशासकीय समायोजनाचे आदेश काढल्यानंतर नगरपरिषदेत नवा वाद उफाळला आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले असले तरी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांना विश्वासात न घेताच ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या समायोजनांतर्गत अलका राऊत, शितल राठोड, प्रमिला जीवने आणि विद्या गजभिये या चार शिक्षकांचे विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या, मंजूर पदे, रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षकांचा आढावा घेऊन शिक्षणाची गुणवत्ता अबाधित राहावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता भासू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणे आवश्यक असताना, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. शिक्षक समायोजनासारख्या संवेदनशील विषयावर एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे आगामी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत हा विषय गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या मतांना डावलून प्रशासन निर्णय घेत असल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा महत्त्वाच्या विषयांवर सामूहिक चर्चा होण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे शिक्षक समायोजनाचा विषय आता केवळ शैक्षणिक न राहता राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरत आहे. नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुनिता जयस्वाल यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "शिक्षक समायोजनाचा निर्णय नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात घेऊन करायचा होता. मात्र मुख्याधिकारी यांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. यामुळे आमचा या प्रक्रियेवर आक्षेप आहे."

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेली पेडगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागली असून, उद्यापासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना घरपोच पिण्याचे पाणी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून पेडगावमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. गावातील या गंभीर समस्येची दखल घेत पत्रकार विश्वास कुटे यांनी पेडगावच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत नळ योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेल. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असून, महिलांच्या श्रमात मोठी बचत होणार आहे. या योजनेचा गावातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. येत्या २२ जून रोजी सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नळाचे पाणी भरून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी पत्रकार विश्वास कुटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पेडगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, पाण्याचा प्रश्न सुटल्याने गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
    3
    गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेली पेडगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागली असून, उद्यापासून ती प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या योजनेमुळे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता गावकऱ्यांना घरपोच पिण्याचे पाणी मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून पेडगावमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होत असल्याने महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत असे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु विविध कारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता.

गावातील या गंभीर समस्येची दखल घेत पत्रकार विश्वास कुटे यांनी पेडगावच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नळ योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत नळ योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.

नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याने गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचेल. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार असून, महिलांच्या श्रमात मोठी बचत होणार आहे. या योजनेचा गावातील आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. येत्या २२ जून रोजी सकाळी ८:३० वाजता पेडगाव येथे नळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असून, सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून नळाचे पाणी भरून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी पत्रकार विश्वास कुटे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पेडगावच्या विकासाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून, पाण्याचा प्रश्न सुटल्याने गावाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरील टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली तब्बल ६९ हजार ५०० किलो सुपारी आणि दोन ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख २५ हजार रुपये आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरून सुपारीची एक मोठी खेप पाठवली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विभागाच्या पथकाने पांढरकवडा तपासणी नाक्यावर कडक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान, संशयास्पद वाटणारे दोन ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा साठा आढळून आला. त्यानंतर पथकाने ट्रकमधील सुपारीची आणि वाहतुकीच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली. मात्र, दोन्ही ट्रकचालकांकडे कुठलीही वैध कागदपत्रे आढळून न आल्यामुळे, अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ट्रकसह ८९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे अधिकारी अमित उपलाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यात अधिकारी नरवाडे आणि जगदीश कापसे यांचा सहभाग होता.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरील टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेली तब्बल ६९ हजार ५०० किलो सुपारी आणि दोन ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८९ लाख २५ हजार रुपये आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला पांढरकवडा-आदिलाबाद मार्गावरून सुपारीची एक मोठी खेप पाठवली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, विभागाच्या पथकाने पांढरकवडा तपासणी नाक्यावर कडक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान, संशयास्पद वाटणारे दोन ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा साठा आढळून आला. त्यानंतर पथकाने ट्रकमधील सुपारीची आणि वाहतुकीच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली.

मात्र, दोन्ही ट्रकचालकांकडे कुठलीही वैध कागदपत्रे आढळून न आल्यामुळे, अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन ट्रकसह ८९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे अधिकारी अमित उपलाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, ज्यात अधिकारी नरवाडे आणि जगदीश कापसे यांचा सहभाग होता.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शिलफाटा येथील आचार गल्लीमध्ये ठाणे महानगरपालिका (टीएमसी) ने केलेल्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाधित व्यापारी आणि गाळे मालकांचा आरोप आहे की, मनपाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या गाळ्यांवर थेट तोडफोड केली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणी ठाणे महानगरपालिका काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    1
    शिलफाटा येथील आचार गल्लीमध्ये ठाणे महानगरपालिका (टीएमसी) ने केलेल्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाधित व्यापारी आणि गाळे मालकांचा आरोप आहे की, मनपाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या गाळ्यांवर थेट तोडफोड केली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणी ठाणे महानगरपालिका काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    1
    बंधन बँकेच्या बचत गट वसुली कर्मचाऱ्याकडून पैशांनी भरलेली बॅग लुटून ₹४८ हजार ७५० रुपयांची रोकड पळवून नेल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी जलद तपास करत एका आरोपीसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकी आणि चोरीच्या रकमेपैकी ₹३० हजार ५०० रोख असा एकूण ₹१ लाख ५० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रामदास मांडवगणे (वय २४, रा. धामणगाव जुना) हे बंधन बँकेचे वसुली कर्मचारी असून, ९ जून रोजी आनंदवाडी, भारसवाडा परिसरातून भीष्णूर येथे वसुलीसाठी जात असताना लघुशंकेसाठी थांबले होते. याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला होता. या घटनेनंतर तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत या बालकाने इतर आरोपींची नावे उघड केली, त्यानंतर पोलिसांनी गौरव संजय डोळस (वय २३, रा. आनंदवाडी) याला अटक केली. आरोपींकडून एमएच-२७ बीएन-९१४५ आणि एमएच-४० एएच-७१७३ क्रमांकाच्या दोन दुचाकींसह चोरीच्या रकमेपैकी ₹३०,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजेंद्र जयसिंगपुरे, निखिल काळे, अतुल अडसड आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश वडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जागतिक योग दिनानिमित्त पांढरकवडा येथे आज, २१ जून रोजी सकाळी नऊ वाजता आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. हे शिबिर विविध सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी आमदार मा. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी स्वतः योगाभ्यास केला. त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करत निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. योग केवळ एक व्यायाम नसून, शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या उदात्त उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
    1
    जागतिक योग दिनानिमित्त पांढरकवडा येथे आज, २१ जून रोजी सकाळी नऊ वाजता आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. हे शिबिर विविध सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी आमदार मा. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी स्वतः योगाभ्यास केला. त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करत निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. योग केवळ एक व्यायाम नसून, शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या उदात्त उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, त्यांच्यामागे जनतेचा मोठा पाठिंबा उभा आहे. त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' याचा उल्लेख करत स्पष्ट केले की, हे केवळ एक राजकीय संघटन नसून, जनतेचा आवाज आणि संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
    1
    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, त्यांच्यामागे जनतेचा मोठा पाठिंबा उभा आहे. त्यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' याचा उल्लेख करत स्पष्ट केले की, हे केवळ एक राजकीय संघटन नसून, जनतेचा आवाज आणि संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वर्ध्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) एका देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिनांक २०/०६/२०२६ रोजी झालेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा परिसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर करण्यात आली. AHTC, वर्धा येथे गोपनीय माहिती मिळाली होती की, सावंगी (मेघे), वर्धा येथील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील व परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत होती. ती या मुलींना कृष्णाई कोर्ट बिल्डिंग, सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावून ग्राहकांसोबत संपर्क साधून देहव्यापार करून घेत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री विनोद चौधरी यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या सूचना व निर्देशानुसार, अत्यंत गोपनीयतेने बनावट ग्राहक (पंटर) तयार करण्यात आला. बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर, AHTC, वर्धा पथकाने कृष्णाई कोर्ट बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३ वर धाड टाकली. या धाडीत राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय २१, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) नावाचा आरोपी आढळून आला. फ्लॅटची झडती घेतली असता, एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करत असताना मिळून आले. पीडित महिलेने चौकशीत सांगितले की ती बाहेरच्या राज्यातील असून, मुस्कान उर्फ शबनमने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले होते. आरोपी मुस्कानने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आणि जागेची देखरेख करण्यासाठी राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार यास ठेवल्याचे दिसून आले. आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ८,०००/- रुपये रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन, वर्धा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असून, महिला आरोपी मुस्कान उर्फ शबनम हिचा शोध सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख (सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    1
    वर्ध्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) एका देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. दिनांक २०/०६/२०२६ रोजी झालेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा परिसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर करण्यात आली.

AHTC, वर्धा येथे गोपनीय माहिती मिळाली होती की, सावंगी (मेघे), वर्धा येथील मुस्कान उर्फ शबनम नावाची महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील व परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत होती. ती या मुलींना कृष्णाई कोर्ट बिल्डिंग, सावंगी (मेघे) टी पॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावून ग्राहकांसोबत संपर्क साधून देहव्यापार करून घेत होती. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री विनोद चौधरी यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांना दिली. त्यांच्या सूचना व निर्देशानुसार, अत्यंत गोपनीयतेने बनावट ग्राहक (पंटर) तयार करण्यात आला.

बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर, AHTC, वर्धा पथकाने कृष्णाई कोर्ट बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १३ वर धाड टाकली. या धाडीत राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय २१, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) नावाचा आरोपी आढळून आला. फ्लॅटची झडती घेतली असता, एका खोलीत बनावट ग्राहक आणि एक पीडित महिला देहव्यापार करत असताना मिळून आले. पीडित महिलेने चौकशीत सांगितले की ती बाहेरच्या राज्यातील असून, मुस्कान उर्फ शबनमने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले होते. आरोपी मुस्कानने ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी आणि जागेची देखरेख करण्यासाठी राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार यास ठेवल्याचे दिसून आले.

आरोपींच्या ताब्यातून तीन अँड्रॉइड मोबाईल, ८,०००/- रुपये रोख रक्कम आणि देहव्यापारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध सावंगी (मेघे) पोलीस स्टेशन, वर्धा येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४३(२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असून, महिला आरोपी मुस्कान उर्फ शबनम हिचा शोध सुरू आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख (सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा) यांनी यशस्वीपणे पार पाडली.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
    1
    अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, असून घटनेचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
    user_LokNazarNews (mukesh dhoke)
    LokNazarNews (mukesh dhoke)
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.