logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चिंबळी-मोशी केटी बंधारा धोकादायक; हजारो नागरिकांचा जीव टांगणीला - जीर्ण दरवाजे, तुटलेले कठडे, पाणीगळती; पर्यायी पूल तयार तरी जोडरस्त्याअभावी वाहतुकीसाठी बंद. कुरुळी : चिंबळी आणि मोशी गावांच्या हद्दीतील इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा (केटी) बंधारा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्याचे अनेक दरवाजे (फळ्या) खराब झाल्या असून, संरक्षक कठडे तुटले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बांधकाम उखडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून, भविष्यात सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठ्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली झाडे, झुडपे आणि कचरा बंधाऱ्यात अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून बंधाऱ्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याने संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढला आहे. मात्र संबंधित विभागाकडून साफसफाई किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बंधाऱ्याचा वापर चिंबळी, मोशी व परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच एमआयडीसीतील कामगार दररोज करतात. मोशी-चिंबळीदरम्यानचा हा मार्ग वेळेची मोठी बचत करणारा असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला पर्यायी पूल पूर्ण असूनही जोडरस्त्याअभावी अनेक वर्षांपासून वाहतुकीसाठी बंदच आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून जीर्ण बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागत आहे. बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे तुटल्याने पावसाळ्यात अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने बंधाऱ्याची दुरुस्ती, झाडाझुडपांची साफसफाई आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योजक चंदन मुऱ्हे यांनी केली आहे.

4 hrs ago
user_Suvarna Jitendra Jadhav
Suvarna Jitendra Jadhav
Administrative attorney Pune City, Maharashtra•
4 hrs ago
03076fcc-58f4-471c-b4f1-6b24248ba625

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    1
    🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।

    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    22 hrs ago
  • थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    1
    थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    1
    अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.