जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर - जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे आकस्मित आरक्षण निश्चित करण्यात आले असून एकूण ३७१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. यामध्ये – *मोठे कोअर प्रकल्प* हतनूर व गिरणा प्रकल्पांतून मागणी : ४२.९०६ दलघमी पाणीपुरवठा : १२९ गावे *मध्यम प्रकल्प* बोरी, भोकरवाडी, मन्याड, अंजनी, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, गुळ मागणी : २०.४७३ दलघमी पाणीपुरवठा : १०८ गावे *लघु प्रकल्प* -३९ मागणी : ११.९४५ दलघमी पाणीपुरवठा : १३४ गावे यापैकी ७ गावे मालेगाव तालुक्यातील असून तीही या आरक्षणात समाविष्ट आहेत. *गिरणा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समिती बैठक १५ डिसेंबरदरम्यान* रब्बी हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अधीन राहून गिरणा प्रकल्पावरील कालवा सल्लागार बैठकीचे नियोजन १५ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सिंचन पाणीपट्टी वसुलीबाबत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. *अधिकारी उपस्थिती* यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक इंजी. संतोष भोसले, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, सौ. अदिती कुलकर्णी, उप अभियंते वैष्णवी तोडकरी, सुभाष चव्हाण, कुलदीप पाटील, तुषार राजपूत आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा विचार करता आकस्मित पाणी आरक्षणास जिल्हास्तरीय समितीने दिलेली मंजुरी हा जिल्ह्यातील ३७१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणारा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.
जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर - जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही
त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे आकस्मित आरक्षण निश्चित करण्यात आले असून एकूण ३७१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. यामध्ये – *मोठे कोअर प्रकल्प* हतनूर व गिरणा प्रकल्पांतून मागणी : ४२.९०६ दलघमी पाणीपुरवठा : १२९ गावे *मध्यम प्रकल्प* बोरी, भोकरवाडी, मन्याड, अंजनी, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, गुळ मागणी : २०.४७३ दलघमी पाणीपुरवठा : १०८ गावे *लघु प्रकल्प* -३९ मागणी : ११.९४५ दलघमी पाणीपुरवठा : १३४ गावे यापैकी ७ गावे मालेगाव तालुक्यातील असून तीही या आरक्षणात समाविष्ट आहेत. *गिरणा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समिती बैठक १५ डिसेंबरदरम्यान* रब्बी हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अधीन राहून गिरणा प्रकल्पावरील कालवा सल्लागार
बैठकीचे नियोजन १५ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सिंचन पाणीपट्टी वसुलीबाबत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. *अधिकारी उपस्थिती* यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक इंजी. संतोष भोसले, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, सौ. अदिती कुलकर्णी, उप अभियंते वैष्णवी तोडकरी, सुभाष चव्हाण, कुलदीप पाटील, तुषार राजपूत आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा विचार करता आकस्मित पाणी आरक्षणास जिल्हास्तरीय समितीने दिलेली मंजुरी हा जिल्ह्यातील ३७१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणारा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.
- महात्मा फुले हायस्कूल येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !... भीमप्रतिज्ञाचे सामूहिक वाचन व बक्षीस वितरण. पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब !... - पी डी पाटील धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्यशोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षक व्ही.टी.माळी सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनपटावरील सुंदर गीत गाऊन अभिवादन केले. शाळेतील उपक्रमशिल शिक्षक पी डी पाटील यांनी सत्यशोधक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद करून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. पुस्तकांसाठी घर बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय असे प्रतिपादन पाटील यांनी केले. याप्रसंगी संविधान दिनाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, लेखणी, चित्रकला वही देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जे एस पवार यांनी बाबासाहेबांनी शिका - संघटित व्हा- आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सांगून बाबासाहेबांना पुस्तके वाचून आदरांजली देऊया असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.1
- एक आपनी जमीन जंगल को सरक्षण के लिए लढ रहे हैं। एक आपनी नौकरी के लिए दोंनो का संघर्ष हैं मगर नौकरी से पहले जमीन और जंगल हैं। और वह आदिवासी है।1
- रक्ताच्या नात्याने केले 'निराधार' पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.! चिखली:- मुलगा नको मुलगी पाहिजे जी दोन्हीही परिवाराला आधार देते अस म्हणतात पण एका मुलीने आपल्या वयोवृद्ध जन्मदातीलाच मुलाच्या सहकार्याने जबर मारहाण करून केले घराबाहेर सविस्तर असे की मूळची जाफराबाद तालुक्यातील असलेली वयस्कर आजी खूप वर्षापासून मेहकर तालुक्यात वास्तव्यात असताना वृद्धपकाळाने पती गेले आणि पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडून मोठ्या शहरात कामानिमित्त व्यस्त झाले.कोणताही आधार नव्हता आणि मग आजी एकटीच इकडे तिकडे भटकंती करत फिरत राहिली.परन्तु आपल्या लोकांची ओढ असल्याने आजी एक दिवस लेकीच्या घरी आली, चिखली तालुक्यात एका गावात ती मुलीकडे आली काही दिवस राहिली परत निघून गेली, परन्तु कुठेही थारा न लागल्यामुळे, कुठेही सहारांना न मिळाल्याने ह्या वयस्कर आजी परत लेकीच्या घरी आली लेक हि आपली सर्व जबाबदारी घेऊन सांभाळ करील याआशेने लेकीच्या घरी आली. मात्र लेकीने मुलाच्या सहकार्याने आजीला जबर मारहाण करून घराबाहेर काढून दिले, नेहमी नेहमी आमच्या घरी काय आहे तुला असे म्हणत धक्के मारून काढून दिले यावर आजीने अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तिच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला निवडणुकीच्या काळ असल्याकारणाने पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आजीकडे पाठ फिरवली. आता या वयोवृद्ध आजीला कळतं नव्हतं करावं काय, कुठे जावं, कुठे सहारा घ्यावा, आजी भटकंती करत चिखली परिसरात आढळून आली मौजे भोकर येथील सरपंच गजानन फोलाने, श्रीकिसन काळे, भोकरचे तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम फोलाने, उपसरपंच अनंता डोंगरदिवे, संदीप डोंगरदिवे, मुकेश डोंगरदिवे, गौतम डोंगरदिवे यांना त्या आजीने सर्व हकीकत सांगितली त्यावरून त्यांनी त्या आजीला मानव सेवा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेले तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी प्रवेशित केले आणि अगदी परिवारा सारखे संभाळ करणारे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी या निराधार आजी ला आधार दिला. त्यांच्या या कार्याच्या कौतुक सर्वत्र होत आहे. तसेच वयोवृद्धांना सांभाळण्याचे कोणास जीवावर येत असेल किंवा कोणी असक्षम असेल तर कृपया त्यांना मारहान न करता त्यांना अपमानित न करता मानव सेवा प्रकल्प च्या ८८५५८५०३७८ यावर संपर्क करून निराधार वृद्धांना प्रवेशित करावे असे आवाहन मानवसेवा प्रकल्प च्या वतीने करण्यात आले आहे.1
- Yeola | सम्राट वर्मा ग्रुप आयोजित सामुदायिक विवाह सोहळा.... प्रतिनिधी सचिन वखारे,येवला.1
- Post by Sugirv Kushwha1
- mhaprinirvan Hardik shubhechha5
- प्राथमिक शिक्षकांचा शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलन जालना जिल्ह्यातील शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद.1
- धरणगावात अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न गुरुचरित्र पारायणात 300 सेवेकऱ्यांचा सहभाग धरणगाव प्रतिनिधी : येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दि. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर गुरुचरित्र पारायण, दैनंदिन आरती, नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणा व दर्शनसेवा अशा विविध धार्मिक उपक्रमांत 10 हजारांहून अधिक भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या सप्ताह काळात अध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या विविध विषयांवर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, कृषीशास्त्र, मराठी अस्मिता तसेच सेवा मार्गात कार्यरत असलेल्या 18 विभागांवर सविस्तर मार्गदर्शन झाले. सेवेकऱ्यांनी सेवेतून आलेले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. सप्ताहकाळात 300 सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. या दरम्यान गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग व रुद्र याग अशा विविध यागांचे आयोजन करण्यात आले. दिवस-रात्र अखंडपणे वीणा वादन, स्वामी चरित्र वाचन व स्वामी समर्थ माळजप प्रहर पद्धतीने करण्यात आले. *तीन दिवसीय युवा प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर* दत्तजयंती अखंड नामजप सप्ताहानिमित्त युवा वर्गासाठी तीन दिवसीय प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नाशिक विभाग आयकर आयुक्त श्री. विशाल मकवाने यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी त्यांनी जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व स्पष्ट करताना सकारात्मक विचार निर्णयक्षमता, वर्तन आणि करिअरवर कसा परिणाम करतात यावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, एकाग्रता वाढवण्याचे प्रभावी उपाय आणि नियोजनाचे तंत्र यांची माहिती दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शिबिरात मॅनिफेस्टेशन या संकल्पनेचे टप्पे, तत्त्वे आणि जीवनातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मॅनिफेस्टेशन म्हणजे मन, ऊर्जा आणि विश्वास यांना एकवटून ध्येय प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया असून, योग्य विचार आणि कृती यांचा संपूर्ण समन्वय साधल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करताना मकवाने यांनी सांगितले की अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. अध्यात्माशिवाय संस्कार आणि मानसिक बळ जीवनात टिकून राहत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. या तीन दिवसीय शिबिराला शहर आणि परिसरातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व सेवेकरी परिवारांनी मोलाचे योगदान दिले.1