कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकाला 50 लाख अनुदान कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान. लातूर (एल पी उगीले) कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण व अभूतपूर्व परिस्थितीत संपूर्ण देशासह लातूर जिल्ह्यात देखील पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावले. कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर असतानाही पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोणतीही भीती न बाळगता रस्त्यावर उतरून नागरिकांचे संरक्षण, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी, जमावबंदीचे पालन तसेच अत्यावश्यक सेवांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली, या कालावधीत नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असताना लातूर पोलीस दलातील पोलीस अमलदार राजकुमार शिवाजी लोखंडे यांना कोरोनाची लागण होऊन दिनांक २१/११/२०२० रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आपल्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण व समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी दिलेले हे बलिदान पोलीस दलासाठी तसेच समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने आज रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते संबंधित मयत पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मयत पोलीस अमलदारांच्या संदर्भातील सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यांनी यावेळी व्यक्त केले की, अशा कठीण प्रसंगी पोलीस विभाग संबंधित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तसेच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर पोलीस दल आपल्या कर्तव्यनिष्ठ सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सदैव उभे आहे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

- Post by Press Mukhed Bablu Mulla2
- लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर1
- Post by Nanded_71
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- Post by Nanded_71