logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 29 एप्रिल : महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक, तहसिल कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेध महाविद्यालय तथा शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजीराबाद नांदेड पर्यंतच्या परिसरातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 29 एप्रिल 2026 रोजीचे 24.00 वाजेपासून ते 2 मे 2026 च्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

3 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago
7f98f49f-a381-409c-8925-da1173fa53f7

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 29 एप्रिल : महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक, तहसिल कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेध महाविद्यालय तथा शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजीराबाद नांदेड पर्यंतच्या परिसरातील शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 29 एप्रिल 2026 रोजीचे 24.00 वाजेपासून ते 2 मे 2026 च्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    4
    नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? 
स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. 
यावर प्रशासन लक्ष देईल का. 
सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. 
अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    9 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026 सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच पडून आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही. विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.
    2
    मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय  
मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच  पडून आहे.
यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते.
मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही.
विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत  तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.
    user_अनंता  लक्ष्मण घुगे
    अनंता लक्ष्मण घुगे
    Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जळकोट
    1
    जळकोट
    user_मुस्तफा कोतवाल
    मुस्तफा कोतवाल
    जळकोट, लातूर, महाराष्ट्र•
    35 min ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    3
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल 
नांदेड:
इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गटारगंगेच्या विळख्यात किल्ला
पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे.
अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव
किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत.
संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार?
नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.