logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करा : विजयकुमार मुंदडा अपघात प्रकरणी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करा - पत्रकारांची मागणी परभणी,दि.11(प्रतिनिधी) : परभणी शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून अपघातमुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी, तसेच ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांच्या अपघाती मृत्यूची जलदगतीने तपासणी करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. प्राचार्य सुरेश नाईकवाडे, विशाल माने, कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, लक्ष्मीकांत रासवे, शिवशंकर सोनुने, राजकुमार हट्टेकर, दत्तात्रय कराळे, डॉ. धनाजी चव्हाण, ज्ञानेश्‍वर उंडाळ, नरहरी चौधरी, लक्ष्मण मानोलीकर, अरुण रणखांबे, विशाल मुंदडा आदी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 11 मे) पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या मागणी संदर्भातील निवेदन सादर केले. त्याद्वारे, मागील अनेक महिन्यांपासून शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. विशेषतः वसमत रोडवर सातत्याने अपघात होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवर ‘प्रतिबंधित झोन’ निर्माण करणे, भाजी व फळ मार्केटसाठी स्वतंत्र झोन तयार करणे, अनधिकृत पार्किंग, रस्त्यालगत वाहन दुरुस्ती व अतिक्रमणांवर कारवाई करणे गरजेचे असून या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यात समन्वय असणे महत्वाचे आहे, असेही या निवेदनात म्हटले. तसेच वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालय, तलाठी कार्यालय, शिवशक्ती बसस्टॉप, कृषी विद्यापीठ गेट, खानापूर फाटा, कारेगाव फाटा, श्री दत्त नाम मंदिर, अबोला फाटा आणि चौपाल महिला वस्तीगृह परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे, अतिक्रमणे हटविणे, वाहतूक सिग्नल सुरू करणे आणि तलाठी कार्यालय परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स बसेसना मनाई करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सकारात्मक भूमिका घेत महापालिका प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. अपघात प्रकरणी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करा... 5 मे रोजी वसमत रोडवरील श्री शिवाजी विधी महाविद्यालयासमोरील गोल्डन बेकरी परिसरात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजयकुमार मुंदडा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी तपास योग्य पद्धतीने होत नसल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(2) अंतर्गत ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करून भरधाव आणि निष्काळजी वाहनचालकांवर निर्बंध लावावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

2 hrs ago
user_Jafar tarodekar
Jafar tarodekar
परभणी, परभणी, महाराष्ट्र•
2 hrs ago
4ff4c969-01c6-43f5-a196-3ddd5539971d

More news from Maharashtra and nearby areas
  • “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    1
    “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
“सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    1
    सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
    2
    गर्भवती महिला हेळसांड:  गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली.
गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    1
    “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!”

मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.

विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.
विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू
ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मनथा येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ११ दिवस पूर्ण झाले. आंदोलकांनी पत्रांचा 'तमाशा' होऊनही प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील मनथा येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ११ दिवस पूर्ण झाले. आंदोलकांनी पत्रांचा 'तमाशा' होऊनही प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli
    1
    हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप
आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन
हि

हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप
आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन
हिंगोली (प्रतिनिधी):
शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले.
प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले.
आमदार संतोष बांगर कडून कौतुक
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा."
प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते.
यांची लाभली उपस्थिती:
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती.
प्रतिक्रिया:
"बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे."
— सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली.
#hingoli
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    1
    महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.