कर्जतच्या ज्वेलर्स चोरीचा पर्दाफाश; चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा तिसराही पोलिसांच्या ताब्यात कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील ओम ज्वेलर्स तसेच बाजारतळ येथील साई ज्वेलर्स दुकानांचे शटर तोडून चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले असून, चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या आणखी एका आरोपीसही जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कर्जत शहरातील ज्वेलर्स चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. दि. ८ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान सोनारगल्ली, कर्जत येथील फिर्यादी उमेश प्रदीप कुलथे (वय ४०) यांच्या ओम ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०८/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी कारवाई करत भगतसिंग सुरेसिंग बावरे (वय २५, रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) आणि लखनसिंग शेरसिंग टाक (वय २४, रा. वडवणी, जि. बीड) या दोघांना अटक केली. तसेच चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या तिसऱ्या आरोपीसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या तपासात या टोळीने मिरजगाव येथे सोनाराचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर तेथून पळून जाताना टोळीने मोटारसायकल चोरी केल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या टोळीचा आणखी कोणकोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कर्जत शहरातील ओम ज्वेलर्स व साई ज्वेलर्स चोरीप्रकरणात भगतसिंग बावरे व लखनसिंग टाक यांना अटक झाली असली, तरी टोळीतील गोविंदसिंग संपतसिंग बावरे, सनीसिंग जितेंद्रसिंग गोवे आणि अजयसिंग महेंद्रसिंग बावरे हे तिघे अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून, आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्जत शहरातील ज्वेलर्स दुकानांना लक्ष्य करून शटर फोडण्याच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांमागील टोळीचा धागा उलगडला असून, फरार आरोपींच्या अटकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

- महिला नगराध्यक्षा अपमानावर खेडकर आक्रमक; “आम्हीही याच मातीतले!” कर्जत / प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीतील महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत अशोक खेडकर यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशोक खेडकर म्हणाले, "ज्या शिवसेनेचे आपण नगरसेवक आहात, त्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची राज्यातील प्रतिमा वेगळी आहे. एकनाथ शिंदे साहेब हे लाडका भाऊ आणि लढवय्या नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिवसेनेत काम करताना महिलांचा सन्मान राखणे अपेक्षित आहे." "महिला नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालणे आणि त्यानंतर नगराध्यक्षांना चप्पलांचा हार घालण्याची धमकी देणे, हे आपणास शोभणारे नाही. सत्तेच्या मस्तीत असाल, मात्र आम्हीही याच मातीतले आहोत. अशा पद्धतीने महिला नगराध्यक्षांचा अपमान केला जात असेल, तर आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, हे विसरू नका," असा इशारा खेडकर यांनी दिला. दरम्यान, चप्पल हार प्रकरणावरून कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे आहेत.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण . शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण दरवर्षीप्रमाणे यंदाही हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे, मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे, प्रेम मुसळे,श्याम परदेशी, अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे ,सिंकदर मन्यार रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर , शिक्षक सखाराम पुरी, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार अशोक काळे यांनी मानले. हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी मंडळाने विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंडळाचा उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही कायम आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला. पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीची तसेच देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली. लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.4
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते1
- विरोधकांनी संविधानाचा अपमान केला; नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पल हार घालून २५ हजार कर्जतकरांचा अपमान - सुनील शेलार यांचा हल्लाबोल कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून विरोधी नगरसेवकांनी केवळ नगराध्यक्षांचाच नव्हे तर संविधानाचा, घटनेचा आणि कर्जतच्या २५ हजार जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात भाजप नेते व नगराध्यक्षा पती सुनील शेलार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी दलित वस्ती निधी दिला नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी विरोधकांनी दिली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निधी वाटप सर्वानुमते झाले - सुनील शेलार यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, "दलित वस्ती निधी वाटपाचा विषय हा एकट्या नगराध्यक्षांचा विषय नाही. या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकत्रित विशेष सभा घेऊन सर्वानुमते निधीचे वाटप केलेले आहे. प्रभाग क्रमांक १५ ला यापूर्वीच सर्वात जास्त निधीचे वाटप झालेले आहे. कर्जत शहरातील इतर प्रभागात देखील मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय बांधव राहतात. त्यांनाही विकासापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे त्या प्रभागात देखील निधी दिला पाहिजे, या सर्व समावेशक भावनेने हा निधी देण्यात आला आहे. यात कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबाह्यता झालेली नाही." "मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी मुद्दामहून या विषयाला वेगळे वळण देऊन नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान केला. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे," असेही शेलार म्हणाले. या घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1