दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली. 00000000
दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली. 00000000
- Post by Labour addaa.1
- बच्चू भाऊ छोट्या बच्चूंना भेटतील की आरोग्यमंत्र्यांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल 1
- कुरूममध्ये १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीचा नुरानी जल्लोष! हजारो भाविकांची भव्य मिरवणूक मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथे १५०१ वा जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या धार्मिक उत्साहात आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. जामा मशिदीतून सकाळी साडेआठ वाजता भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. नात-ए-पाकच्या स्वरांनी आणि ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कुरूमसह बाहेरगावाहून आलेल्या नातख्वानांनी नात-ए-पाक सादर केली. विविध परिसरांमध्ये आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि सुंदर सजावट करण्यात आली होती. यावेळी मौलाना अन्सारुल हक साहेब यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनातील समानता, न्याय, शांतता, बंधुता आणि उत्तम आचरणाचा संदेश दिला. देशात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा, शेतकरी सुखी व्हावा आणि सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी विशेष दुआ करण्यात आली. मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी माना पोलीस स्टेशन आणि कुरूम पोलीस चौकीच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनीही कार्यक्रमाला भेट दिली. 📍 ठिकाण: कुरूम, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला 🎥 बातमी: सफदर शहा, कुरूम 📺 India News R7 Marathi अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी India News R7 Marathi ला Subscribe करा.1
- आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए- मिलादुन्नबी उत्सवानिमित्त दत्तापूर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, सजावट आणि सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आठवडी बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत विविध मार्गांवरून पुढे धामणगांव रेल्वे शहराच्या दिशेने आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत होती. धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीतील आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि विविध प्रकारच्या कलात्मक रचना उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बालके, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक बालकांनी सुंदर पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी हिरवे झेंडे फडकताना दिसत होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक, पोस्टर आणि सजावटीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मार्गावर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याच भावनेतून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. मिरवणुकीत लहान बालकांपासून युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे आठवडी बाजार ते धामणगांव रेल्वे मार्गावर ईद-ए-मिलादुन्नबी उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* *💥आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग* *💥ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो* *💥शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन* *💥दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते* *✍️सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* *7350846789 /WhatsApp 8421078244* *1
- जश्मे ईद मिलादुन्नबी आर्वी मे शानदार रैली शहर कमिटी आर्वी1
- शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! शुरू ऐप च्या वृत्ताची दखल मुंडगाव येथील त्या फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती! अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील नागरिकांना प्यावे लागते नाली मधील घाणयुक्त दुषित पाणी या कडे मुंडगाव ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता.या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त दि.२६ ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल घेत मुंडगाव ग्रामपंचायत ने त्वरित फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम दि.२७ ऑगस्ट रोजी सुरू केले आहे. मुंडगाव लोहारी रोड लगत असलेल्या जनतेला पिण्याचे पाणी 15 दिवसातुन एक वेळ मिळते व सदर मुंडगाव मधील अनेक वस्त्यांना गावातील सांडपाण्याच्या नाल्यानंमधुन पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली आहे.मात्र सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असुन त्या मधुन हजारों लिटर पाणी जनतेला प्यायला न मिळता वाया जात आहे.तसेच पाणी पुरवठा बंद झाल्यावर पाईप लाईन मध्ये गट्टारा मधिल घाणयुक्त पाणी या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन मध्ये जाऊन ते पाणी मुंडगाव येथील नागरिकांना प्यायला मिळत होते.मात्र या बाबतीत येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाहु वानखडे यांनी मुंडगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सैय्यद नजाकत यांचे सह सरपंच,उपसरपंच, सदस्य सह अकोट पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनाही फोन वरून या बाबतीत माहिती दिली व विस्तार अधिकारी यांनी सुद्धा आश्वासन दिले की मि ग्रामसेवक यांना फोन वरून सांगतो व याला २ ते ३ महिने ओलांडून गेली तरी सुद्धा या पाईप लाईन ची दुरुस्ती अद्याप ही केली नसल्या बाबतीत शुरू ऐप मध्ये वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने या कडे लक्ष देऊन येथील फुटलेली पाईप लाईन दुरुस्त कली.व या बाबतीत शुरू ऐप चे नागरिकांनी आभार व्यक्त केले.2
- *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला. *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.2
- Post by Labour addaa.1