नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोयगाव (प्रतिनिधी) दि.20, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सोयगाव नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकासकामांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून जवळपास १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत सोयगाव येथील वार्ड क्रमांक ८, शेवळी परिसरात चिल्ड्रन पार्क उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच दयानंद नगर भागात सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील बायपास रोडजवळ बसस्थानक उभारण्याचा महत्त्वाचा प्रकल्पही या अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाची कामेही करण्यात येणार आहेत. या कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले. ---------------- “सोयगावच्या विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा मुळे आज ही कामे प्रत्यक्षात येत आहेत, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या या विविध विकास कामांमुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळातही आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने सोयगावचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले." या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगराध्यक्ष आशाबी तडवी,कुसम बाई दुतोडे,नगरसेवक संतोष बोडखे, रऊफ शेख, भगवान जोहर, राजू दुतोंडे, सोयगावातील सामाजिक कार्यकर्ते कडूबा इंगळे, रमेश इंगळे, सुनील सोनवणे, गजानन तायडे, पंडित महाराज, संतोष मिसाळ, कैलास पिंगळकर, विकास रोकडे, संतोष सोहनी, रत्नाकर सोहनी, महेश दुसाने, नंदू आप्पा सोहनी, यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो : दत्तात्रय काटोल)
नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोयगाव (प्रतिनिधी) दि.20, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सोयगाव नगरपंचायत अंतर्गत सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकासकामांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून जवळपास १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत सोयगाव येथील वार्ड क्रमांक ८, शेवळी परिसरात चिल्ड्रन पार्क उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच दयानंद नगर भागात सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील बायपास रोडजवळ बसस्थानक उभारण्याचा महत्त्वाचा प्रकल्पही या अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट काँक्रीट
नाली बांधकामाची कामेही करण्यात येणार आहेत. या कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले. ---------------- “सोयगावच्या विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा मुळे आज ही कामे प्रत्यक्षात येत आहेत, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या या विविध विकास कामांमुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी काळातही आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने सोयगावचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले." या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर काळे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगराध्यक्ष आशाबी तडवी,कुसम बाई दुतोडे,नगरसेवक संतोष बोडखे, रऊफ शेख, भगवान जोहर, राजू दुतोंडे, सोयगावातील सामाजिक कार्यकर्ते कडूबा इंगळे, रमेश इंगळे, सुनील सोनवणे, गजानन तायडे, पंडित महाराज, संतोष मिसाळ, कैलास पिंगळकर, विकास रोकडे, संतोष सोहनी, रत्नाकर सोहनी, महेश दुसाने, नंदू आप्पा सोहनी, यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो : दत्तात्रय काटोल)
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- Post by Subhash Suryavanshi1
- मराठवाड्यात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा इशारा 🌩️ मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्वाचे मुद्दे: 30–40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना काही भागात जोरदार सरींची शक्यता तापमानात किंचित घट होणार कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचना: वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नका विजांच्या वेळी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा शेतकऱ्यांनी पिकांची आणि साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1