logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रिसोड शहरातील प्रमुख शाळांसमोर गतिरोधक बसविणे अत्यावश्यक रिसोड शहरातील प्रमुख शाळांसमोर गतिरोधक बसविणे अत्यावश्यक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी रिसोड : शहरातील प्रमुख शाळांसमोरील रस्त्यांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुट्टीच्या वेळेत या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी संबंधित ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी केली आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिल्यास अपघातांची शक्यता कमी होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे अनेक शाळांसमोर वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याने लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणांची पाहणी करून नियमानुसार गतिरोधक, इशारा फलक आणि झेब्रा क्रॉसिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे. रिसोड शहरातील सिविल लाईन मार्गावर दोन मोठ्या शाळा आहेत या शाळेत शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता शहर व ग्रामीण भागातून येतात यात प्रामुख्याने श्री शिवाजी विद्यालय असून यालगतच लायसियम इंग्लिश स्कूल आहे.शाळा सुटणे व भरणे च्या वेळेस या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते मात्र या समोरच या दोन्ही शाळा समोरच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. यातच काही बेभान तरुण वेगाने आपल्या दुचाकी या रस्त्यावर धावत असतात. शहरातील सर्वात मोठी असलेली भारत माध्यमिक विद्यालय, भारत माध्यमिक कन्या शाळा, भारत माध्यमिक प्राथमिक शाळा सनराइज इंग्लिश स्कूल, नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळा, नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा या ठिकाणी हजारोचे संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येत असतात शहरातील लोणी रोड, भाजी मंडी, या ठिकाणी गतिरोधक असणे अत्यावश्यक आहे. लोणी फाटा व भाजी मंडी हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून या ठिकाणी वाहनाची मोठी गर्दी असते तर ट्रॅफिक जामची नेहमी समस्या असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित असल्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. रिसोड मालेगाव मार्गावर सावित्रीबाई फुले शाळा व नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळा असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविणे अत्यंत गरजेचे आहे.लहान मुलांना रस्ता ओलांडण्यास या ठिकाणी अत्यंत खबरदारी घ्यावी लागते. मात्र यातच सुसाट वेगाने वाहणारे वाहन यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित असतो.

8 hrs ago
user_Suresh Badrigiri Giri
Suresh Badrigiri Giri
Mechanic रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    1
    बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग
बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में  बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए।
अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।
यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    user_गुफरान शेख
    गुफरान शेख
    Local News Reporter बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    1
    जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    1
    बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    4
    वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक
या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.