logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

‘बालविवाह मुक्ती रथा’चा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूर : प्रतिनिधी समाजातील बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. ‘बालविवाह मुक्त जिल्हा’ या संकल्पनेतून जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘बालविवाह मुक्ती रथा’चा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या रथाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील सुमारे ५० गावांमध्ये हा रथ फिरणार आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायत, शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी दोन तास थांबून नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच ‘आम्ही बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही’ अशी सामूहिक शपथही गावकऱ्यांकडून घेतली जाणार आहे.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, गेल्या तीन-चार वर्षांत जिल्ह्यात ज्या ठिकाणी बालविवाहाच्या घटना आढळल्या, त्या ठिकाणी प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई केली आहे. ग्रामसेवकांना ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ तर अंगणवाडी सेविकांना ‘सह-प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून जबाबदारी देण्यात आली असून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.नागरिकांनी आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ ‘१०९८’ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 day ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 day ago
3d242ebb-8be4-4786-be9c-5c90db1b48f1

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Akash mane
    1
    Post by Akash mane
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    19 min ago
  • वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    1
    वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    1
    AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. 
#AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    36 min ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    1
    एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.