logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नीरा-देवघर धरण परिसरात रविवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या चार मित्रांपैकी देवेश राज मिश्रा (वय २८, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे चार तरुण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वरंधा घाट परिसरात फिरायला गेले होते. यावेळी त्यांनी वेणूपुरी गावाजवळील नीरा-देवघर धरण परिसराला भेट दिली. धरणातील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते नदीपात्रात उतरले. यादरम्यान, देवेश मिश्रा याला पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तात्काळ आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर देण्यात आली. माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक, भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर देवेश मिश्रा यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळी आणि धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

3 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago
f41253de-c858-4593-89aa-9753fa12488f

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या नीरा-देवघर धरण परिसरात रविवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या चार मित्रांपैकी देवेश राज मिश्रा (वय २८, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे चार तरुण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वरंधा घाट परिसरात फिरायला गेले होते. यावेळी त्यांनी वेणूपुरी गावाजवळील नीरा-देवघर धरण परिसराला भेट दिली. धरणातील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते नदीपात्रात उतरले. यादरम्यान, देवेश मिश्रा याला पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या खोल भागात जाऊन बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तात्काळ आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर देण्यात आली. माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक, भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर देवेश मिश्रा यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळी आणि धरण परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सभापती मा. श्री. ए.जे. पाटील बोराडे यांनी नामदेव रामचंद्र पवार यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्याचे समजताच तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रुग्ण सेवक आणि सोशल वर्कर मंगेश रोहिदास राठोड यांनी बोराडे यांच्या या कृतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. राठोड यांनी नमूद केले आहे की, ए.जे. पाटील बोराडे यांच्या या आपुलकीच्या, मायेच्या आणि आधार देणाऱ्या कृतीमुळे रुग्ण नामदेव रामचंद्र पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आधार मिळाला. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि सहकार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे आभार संदेशात म्हटले आहे. मंगेश रोहिदास राठोड यांनी ए.जे. पाटील बोराडे यांचे हे प्रेम व आशीर्वाद सदैव असेच राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.
    1
    शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सभापती मा. श्री. ए.जे. पाटील बोराडे यांनी नामदेव रामचंद्र पवार यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्याचे समजताच तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रुग्ण सेवक आणि सोशल वर्कर मंगेश रोहिदास राठोड यांनी बोराडे यांच्या या कृतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

राठोड यांनी नमूद केले आहे की, ए.जे. पाटील बोराडे यांच्या या आपुलकीच्या, मायेच्या आणि आधार देणाऱ्या कृतीमुळे रुग्ण नामदेव रामचंद्र पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा मानसिक आधार मिळाला. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि सहकार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे आभार संदेशात म्हटले आहे.

मंगेश रोहिदास राठोड यांनी ए.जे. पाटील बोराडे यांचे हे प्रेम व आशीर्वाद सदैव असेच राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे.
    user_Mangesh Rathod
    Mangesh Rathod
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयात साखळी उपोषण केले. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते, कारण उन्हाळी सत्र संपत आले असतानाही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपोषणात सुकन्या बावस्कर, श्रीया महाजन, श्रावणी साबळे, रोहित पवार, शुभम भोसले आणि ओम पवार यांनी सहभाग घेतला. अभाविपच्या या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेतली. अवघ्या तीन तासांत अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. वेळापत्रक जाहीर होताच, विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर यांच्या हस्ते फलाहार घेऊन आंदोलनाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुकन्या बावस्कर यांनी स्पष्ट केले की, उत्तम शिक्षण आणि वेळेवर परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क असून, अभाविप नेहमीच विद्यार्थी हितासाठी आग्रही राहिली आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहील.
    1
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयात साखळी उपोषण केले. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते, कारण उन्हाळी सत्र संपत आले असतानाही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपोषणात सुकन्या बावस्कर, श्रीया महाजन, श्रावणी साबळे, रोहित पवार, शुभम भोसले आणि ओम पवार यांनी सहभाग घेतला.

अभाविपच्या या आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेतली. अवघ्या तीन तासांत अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. वेळापत्रक जाहीर होताच, विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर यांच्या हस्ते फलाहार घेऊन आंदोलनाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुकन्या बावस्कर यांनी स्पष्ट केले की, उत्तम शिक्षण आणि वेळेवर परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क असून, अभाविप नेहमीच विद्यार्थी हितासाठी आग्रही राहिली आहे आणि भविष्यातही विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहील.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • परभणी शहर एका भीषण घटनेने हादरले आहे. परभणीतील यशवाडी येथील मारुती मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत मारुती मंदिराचे छत कोसळले.
    1
    परभणी शहर एका भीषण घटनेने हादरले आहे. परभणीतील यशवाडी येथील मारुती मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत मारुती मंदिराचे छत कोसळले.
    user_Fitcoach Yunus Shaikh
    Fitcoach Yunus Shaikh
    Fitness Trainer Jafrabad, Jalna•
    14 hrs ago
  • बाजार सावंगी येथे एका चहाच्या हॉटेलमध्ये थुंकण्यास विरोध केल्याच्या रागातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीची खुलताबाद पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
    4
    बाजार सावंगी येथे एका चहाच्या हॉटेलमध्ये थुंकण्यास विरोध केल्याच्या रागातून दोन भावांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीची खुलताबाद पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • संजय जाधवांसह सहा खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर जात आहेत. 27 जूनपासून दोन दिवसांसाठी उद्धव ठाकरे परभणीत मुक्कामी असतील, जिथे ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. बंडानंतर पक्षाची संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत.
    1
    संजय जाधवांसह सहा खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर जात आहेत. 27 जूनपासून दोन दिवसांसाठी उद्धव ठाकरे परभणीत मुक्कामी असतील, जिथे ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. बंडानंतर पक्षाची संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत.
    user_Abn news
    Abn news
    Media company Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नुकतेच राबवलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' यशस्वी ठरले आहे. या मोहिमेअंतर्गत, चिकलठाणा पोलिसांनी एकाच रात्रीत मोठी कारवाई करत ११ वाहने जप्त केली. या कारवाईतून पोलिसांनी ८ गुन्हे दाखल केले असून, एकूण ₹१ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नुकतेच राबवलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' यशस्वी ठरले आहे. या मोहिमेअंतर्गत, चिकलठाणा पोलिसांनी एकाच रात्रीत मोठी कारवाई करत ११ वाहने जप्त केली. या कारवाईतून पोलिसांनी ८ गुन्हे दाखल केले असून, एकूण ₹१ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना शहरात वाढत्या गुंडगर्दीमुळे निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर स्थितीवर चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे यांनी काही उपस्थित लोकांना सोबत घेऊन ही भेट घेतली आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एसपींसोबत सविस्तर चर्चा केली.
    1
    जालना शहरात वाढत्या गुंडगर्दीमुळे निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर स्थितीवर चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे यांनी काही उपस्थित लोकांना सोबत घेऊन ही भेट घेतली आणि शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एसपींसोबत सविस्तर चर्चा केली.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून, सध्या युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून, सध्या युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.