शहापुरात एक दिवसात शेकडो शासकीय दाखल्यांचे वाटप ठाणे :राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा शहापूर तालुक्यात नुकताच पार पडला. चेरपोली येथील शेट्टी मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ घेतला. नागरिकांना महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या सेवा थेट, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज सुशासन अभियान' राबविण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येत आहे. या शिबिरादरम्यान नागरिकांना जमीन मोजणी, नकाशे उपलब्ध करून देणे, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, सातबारा उतारे, तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर शहापूर येथे हे अभियान पार पडले. या शिबिरादरम्यान प्रशासनाने तत्परता दाखवत नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित एकूण १८ प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये डिजिटल ७/१२ उतारे, विविध दाखले तसेच शेतीसंबंधित सेवांचा समावेश होता. शिबिरात ८५७ डिजिटल ७/१२ उतारे, २८५ आठ-अ उतारे, २७५ प्रकरणांमध्ये अकृषिक परवानगी व मोजणी संदर्भात जनजागृती, १५५ रहिवासी दाखले, १०८ उत्पन्न प्रमाणपत्रे, ९० सत्यप्रतिज्ञापत्रे (अॅफिडेव्हिट), ६८ शेती पीक नुकसान ई-केवायसी प्रकरणे तसेच ४७ शिधापत्रिका (रेशन कार्ड) संबंधित सेवा देण्यात आल्या.

- ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.1
- श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे1
- AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!1
- गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप1
- गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न1
- नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai1
- Post by Nirbhay Nagri1
- ठाणे: शहापूर तालुक्यातील भावसे गावात ८३ वर्षा पासुन रंगपंचमीच्या दिवशी चैतन्य कानिफनाथ महाराज सिध्द समाधी मंदीर (कोकण मढी) येथे मंदीराचे मुख्य पुजारी गुरूवर्य प्रभाकर महाराज गोदडे यांच्या मार्गर्दर्शानाने यात्राउत्सवाला सुरूवात झाली सकाळी समाधी अभिषेक झालं त्या नंतर नवस फेडण्याचा कार्यक्रम व पारंपारीक देव गाण्याचा कार्यक्रम पारपडला सायंकाली नाथसरकार ढोलताशा पथक , कानीफनाथ सेवा मंडळ पारंपारीक भजन व बॅान्जोच्या गजरात पालखी छबिणा सोहळा व नाथांच्या मानाच्या काठ्या व ताईत भरण्याचा कार्यक्रम पारपडला तसेच गाव कमीटीने लावणीचा कार्यक्रम आयेजीत केला होता यात्रे साठी शेकडो दुकानदार व्यावसायीक आले होते . ठाणे , पालघर व मुंबई जिल्ह्यातील हाजारो भावीकांनी दर्शन घेतला.3