logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भटक्या प्राण्यांना सुरक्षा बेल्ट बांधून अनोखे रक्षाबंधन रात्रीच्या अपघातांपासून संरक्षणाचा उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम नांदेड : रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने शहरातील भटकी कुत्री तसेच भटकी जनावरे यांना सुरक्षा बेल्ट लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, म्हशी व कुत्र्यांना वाहनांच्या धडकेमुळे होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणारी जनावरे अंधारात वाहनचालकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन प्राण्यांसह वाहनचालकांनाही इजा होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा बेल्ट लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय रुग्णालय, वर्कशॉप परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आली. या ठिकाणी भटकी कुत्री आणि भटक्या जनावरांना सुरक्षा बेल्ट लावण्यात आले. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या असिस्टंट मॅनेजर सिंधु वासमवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्राण्यांप्रती संवेदनशीलता आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनोख्या रक्षाबंधनातून मुक्या प्राण्यांच्या संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

12 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
12 hrs ago
df9d9b8c-db36-4dc1-8852-56a2279b7651

भटक्या प्राण्यांना सुरक्षा बेल्ट बांधून अनोखे रक्षाबंधन रात्रीच्या अपघातांपासून संरक्षणाचा उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम नांदेड : रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने शहरातील भटकी कुत्री तसेच भटकी जनावरे यांना सुरक्षा बेल्ट लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, म्हशी व कुत्र्यांना वाहनांच्या धडकेमुळे होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणारी जनावरे अंधारात वाहनचालकांना दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन प्राण्यांसह वाहनचालकांनाही इजा होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा बेल्ट लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय रुग्णालय, वर्कशॉप परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आली. या ठिकाणी भटकी कुत्री आणि भटक्या जनावरांना सुरक्षा बेल्ट लावण्यात आले. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या असिस्टंट मॅनेजर सिंधु वासमवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, प्राण्यांप्रती संवेदनशीलता आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनोख्या रक्षाबंधनातून मुक्या प्राण्यांच्या संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद
मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; 
कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • श्री क्षेत्र माहुर गडावर परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल भक्तांचा महासागर लोटला होता तसेच प्रशासनाचे नियोजन अपुरे पडल्याचे चित्र पहावयास मिळाले
    1
    श्री क्षेत्र माहुर गडावर परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल भक्तांचा महासागर लोटला होता तसेच प्रशासनाचे नियोजन अपुरे पडल्याचे चित्र पहावयास मिळाले
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    1
    पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!
दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटील यांचे पुन्हा उपोषण गावात तगडा पोलीस फौजफाटा तैनात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जालना जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा साथ महाराष्ट्राची न्यूज! #ManojJarangePatil #AntarwaliSarati #MarathaReservation #JalnaPolice #MaharashtraNews #SaathMaharashtrachiNews #MarathaAndolan #BreakingNews
    1
    अंतरवाली सराटीत  मनोज जरांगे-पाटील यांचे पुन्हा उपोषण गावात तगडा पोलीस फौजफाटा तैनात
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जालना जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा साथ महाराष्ट्राची न्यूज!
#ManojJarangePatil #AntarwaliSarati #MarathaReservation #JalnaPolice #MaharashtraNews #SaathMaharashtrachiNews #MarathaAndolan #BreakingNews
    user_Saath maharashtrachi news
    Saath maharashtrachi news
    Local News Reporter केज, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    1
    इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश
रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे.
आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली. *हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी* जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    1
    जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..


जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
*हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी*
जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 min ago
  • प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी
    1
    प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    1
    संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..

सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..


संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..
सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    30 min ago
  • बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    1
    बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार 
बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी  प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान  झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत  महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.