तब्बल १७ वर्षांनी एकत्र भेट स्नेहमेळावा संपन्न चाकुर तालुक्यातील मौजे अजनसोंडा (बु) येथील डॉ.मधुसूदन बांगड विद्यालय येथे 2008 - २००९ बॅच दहावीतील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर (स्नेहमेळावा) कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.. या कार्यक्रमाला आजी माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर माजी दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते..! माजी विद्यार्थी डॉ.वर्षारांनी हाके, डॉ. सोनाली आयनुले, डॉ. येणगे गहिनीनाथ, इस्माईल शेख (सोशल मिडिया),सचिन बोके,सचिन तेलंगे,काशिनाथ पोलावार,किरण डोंगरगावे,दीक्षा माने या विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक स्व खर्चातून शाळेला फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून शाळेला पिण्याच्या पाण्याचे (पाणपोई ) टाकीचे बांधकाम करून शाळेसाठी अनोखी भेट दिली.. अजनसोंडा (बु) परिसरात सर्वत्र या माजी विद्यार्थ्यांचा शाबासकीची चर्चा सर्वत्र होत आहे..!
तब्बल १७ वर्षांनी एकत्र भेट स्नेहमेळावा संपन्न चाकुर तालुक्यातील मौजे अजनसोंडा (बु) येथील डॉ.मधुसूदन बांगड विद्यालय येथे 2008 - २००९ बॅच दहावीतील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर (स्नेहमेळावा) कार्यक्रम आयोजित
करण्यात आले होते.. या कार्यक्रमाला आजी माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर माजी दहावीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते..! माजी विद्यार्थी डॉ.वर्षारांनी हाके,
डॉ. सोनाली आयनुले, डॉ. येणगे गहिनीनाथ, इस्माईल शेख (सोशल मिडिया),सचिन बोके,सचिन तेलंगे,काशिनाथ पोलावार,किरण डोंगरगावे,दीक्षा माने या विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक स्व खर्चातून शाळेला फूल नाही तर फुलाची पाकळी
म्हणून शाळेला पिण्याच्या पाण्याचे (पाणपोई ) टाकीचे बांधकाम करून शाळेसाठी अनोखी भेट दिली.. अजनसोंडा (बु) परिसरात सर्वत्र या माजी विद्यार्थ्यांचा शाबासकीची चर्चा सर्वत्र होत आहे..!
- संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.1
- *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.1
- Post by EKMAT DIGITAL1
- विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला1
- लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.2
- आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत1
- आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत1
- उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.1