पुणे लातूर शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. "संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.

- आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग1
- सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख1
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या महान प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाचा व स्वाभिमानाचा उजेड दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजप्रबोधनाची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, उपाध्यक्ष लखन गायकवाड, सागर उबाळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, दत्तात्रेय गजभार, सर लक्ष्मण बनसोडे, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.1
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1