जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट ; ९ ते ११ मार्चदरम्यान उष्ण व दमट हवामानाचा इशारा जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट ; ९ ते ११ मार्चदरम्यान उष्ण व दमट हवामानाचा इशारा जालना जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेली यांनी दिलेल्या सूचनेनुसार ९ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवू शकतो, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना कडून यासंदर्भात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदल लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर न पडणे, बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करणे तसेच हलके व सैल सुती कपडे परिधान करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे किंवा ओआरएससारख्या पेयांचे सेवन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय उन्हाच्या काळात अति श्रमाची कामे टाळावीत, दारू, जास्त चहा-कॉफी किंवा कार्बोनेटेड पेयांचे सेवन करू नये तसेच लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा आरोग्य विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- mujeeb shaikh1
- राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज1