उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या चातारी घाटावर अवैध रेती तस्करांचा हैदोष! एलसीबी यवतमाळच्या पुसद कॅम्पचे अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांवर खासदार पुत्राची दादागिरी! वरिष्ठ अधिकाऱ्यानी केले हातवर! अखेर एलसीबी अधिकारी व महसूल कर्मचारी रिटर्न विथ थँक्स टू सन ऑफ खासदार ! लोकप्रतिनिधीचा पुत्र जेव्हा कायदा हातात घेतो तेव्हा कायदा रक्षक हातात बांगड्या का घालतात? सर्वसामान्यांचा रक्षक कोण? महाराष्ट्रात महाविकास *आघाडीचे नेते संविधान दाखवत जागोजागी फिरत असतात विद्यमान सत्ताधारी भाजपा सतत संविधानाचा जो अपमान करीत असते म्हणून टोहो फोडणारे उद्धव ठाकरे यांचे सेनेचे खासदार नागेश पाटील यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी अक्षरशः संविधानाने दिलेला कायदा मोडीत काढीत चक्क एलसीबी यवतमाळ पुसद कॅम्पचे पोलीस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरत अवैध रेती उपसा करणाऱ्या आपल्या माणसांना वाचविण्याची घटना उमरखेड तालुक्यातील चातारी दिघी पैनगंगा नदीच्या काठावर घडली आहे या घटनेत कृष्णा पाटलाच्या रुद्रअवतारा कडे पाहून जमा झालेल्या ४०० ते ५०० लोकांना पाहून पोलिसांना व महसूल कर्मचाऱ्यांना घाम फुटला असे समजते एलसीबी यवतमाळ पोलिसांसोबत हिमायतनगरचे पोलीस देखील तिथे होते परंतु त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाहीअशी ही माहिती मिळाली आहे या घटनेने घाबरलेल्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी खासदार पुत्र कृष्णा पाटील यांना हात जोडून धन्यवाद देत काढता पाय घेतला! एवढी वाईट परिस्थिती खासदार पुत्राच्या दादागिरीमुळे कर्तव्यावर असणाऱ्या व कायद्याचे पालन करणाऱ्या पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांवर आली याबाबत वरिष्ठांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी "ती आमची टीम नाही"असे म्हणून हात वर केले परंतु वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही हे विशेष! आता बोला!* *उमरखेड तालुक्यात चातारी ब्राह्मणगाव दीघडी बोरी कोपरा तिवडी टाकळी गुरफळी हातला नांदला वगैरे पैनगंगा नदीच्या घाटावर अधिकृत घाट घेऊनही एकाच रॉयल्टीवर ४ते५ ट्रिप्स रेती अवैध मार्गाने उपसा करून विक्री केल्या जात आहे त्याकडे महसूल व पोलिसांची अतिशय दुर्लक्ष आहे वरिष्ठ अधिकारी तथा अनेक संबंधित अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे उघड बोलले जात आहे अशा अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी आलेल्या एलसीबी पोलीस व महसूल कर्मचाऱ्यावर खासदाराचा पुत्र दादागिरी करून त्यांना तिथून जाण्यास भाग पडतो यावरून खरंच उमरखेड तालुक्यात कायदा आहे का? हा प्रश्न निर्माण होतो कायदा बनवणारे आमदार खासदार काय करीत आहेत त्यांचेच नातेवाईक कायदा तोडून कायदा रक्षकांना धमकावीत असतील तर सर्वसामान्यांचा वाली कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे विदर्भातील रेती नाही तर आमच्या मराठवाड्यातील रेती आम्ही नेत आहोत म्हणजे मराठवाड्यातील अधिकृत कायदेशिर रेती नेत आहात की अवैध मार्गाने नेत आहात ?याबाबत खुलासा कोण करणार? सदर प्रकरण चातारीचे नसेल दिघीचे असेल तर मग पोलिसांनी६ ट्रॅक्टर चातारी घाटावर का पकडले? रेती घाट अधिकृत हरास झाला असेल व त्याची रॉयल्टी जर या६ ट्रॅक्टर चालकाजवळ होती तर ती संबंधित पोलिसांना दाखवून कायदेशीर मार्गाने वाहने नेता आले असते त्यासाठी खासदार पुत्राला दादागिरी करायची गरज काय? सदर रेती घाटामध्ये खासदार पुत्राची आर्थिक गुंतवणूक तर नाही ना? कारण ६ ट्रॅक्टरला सोडवण्यासाठी त्यांना आपले वडील खासदार म्हणजे कायदा बनवणारे नेते असताना देखील कायदा पायदळी तुडवण्याची वेळ आली आहे याचा अर्थ काय? आम्ही यांना निवडून द्यायचे आणि यांनी आपल राजकारण जनसेवेपेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करायचे असा हा उघड केलेला प्रकार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी तर ह्या प्रकारावर मौन धरून आहेत त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही कारण काय? याचे जाहीर उत्तर ते उमरखेडच्या जनतेला देतील का? या भयंकर गैरप्रकारावर यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आपल्या कर्मचाऱ्याला साथ देण्यासाठी खासदार पुत्रावर व त्यांच्या सहकार्यावर कारवाई करतात किखासदार पुत्राच्या दादागिरीकडे तेही दुर्लक्ष करून हात वर करतात? तसेच या भयंकर गैरप्रकाराकडे यवतमाळच्या पालकमंत्र्याची व पुसदच्या मंत्र्यांची तथा उमरखेडच्या आमदाराची कोणती भूमिका राहते? याआधी लोकसभेच्या निवडणुकीत याच खासदार पुत्राने चेक पोस्टवर त्यांची गाडी तपासताना पोलिसांचा मोबाईल फेकून दिला होता मोबाईल फुटला होता त्यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे परंतु अद्याप पुढील कारवाई झाली नसल्याचे समजते! बाकी खरा खोटा प्रकार पोलिसांना व महसूल अधिकाऱ्यांनाच माहिती तूर्तास एवढेच!

- Post by Nandkumar Motiram Totewad1
- वादळी पावसाने हिमायतनगर हादरले! सोमवारी मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌳 झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बाधित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली 🌾 शेतीला मोठा फटका 🥭 आंबा, चिकू फळबागांचे नुकसान 🌾 उन्हाळी ज्वारी व वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. #हिमायतनगर #वादळीपाऊस #नांदेड #शेतकरी #नुकसान WeatherUpdate Maharashtra BreakingNews Farmers1
- हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.1
- Post by वैजनाथ पावडे1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- Post by Mohammad Rafikh1
- दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1