भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतपिके व फळबागांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी ५०,०००/- रुपये त्वरित मदत देण्याबाबत मा.उपविभागीय_अधिकारी भोकरदन यांना मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांचे निवेदन... भोकरदन इसरारखान पठाण जाफ्राबाद तालुक्यासह जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यासह परिसरामध्ये अलीकडेच झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी वर्गावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. या अनियमित हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेली हरभरा, गहू, मका, कांदा यांसारखी पिके तसेच टरबूज, खरबूज, आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे अत्यंत भीषण नुकसान झालेले आहे. सदर गारपीट व पावसामुळे उभी पिके पूर्णपणे झोडपली जाऊन आडवी पडली आहेत, तर काढणीस आलेले धान्य मातीमोल झाले आहे. याशिवाय ओलसर हवामानामुळे फळबागांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले असून त्यांची वर्षभराची मेहनत अक्षरशः वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंताग्रस्त, हतबल व आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संबंधित महसूल यंत्रणेमार्फत त्वरित नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्यात यावेत व विलंब न लावता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात यावी.तरी भोकरदन व जाफ्राबाद येथील तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात याव्यात आणि बाधित शेतकऱ्यांना एकरी किमान ५०,०००/- रुपये आर्थिक मदत त्वरित मंजूर करून वितरित करण्यात यावी. अशी मागणी मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी मा. उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली व तातडीने दखल घेण्यास सांगितले. नसता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला.

- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.2
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था. नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई. दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई. हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1