अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली ( रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र पोलीस खात्यात गुणवत्ता पुर्वक सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा मानसन्मान व गुणगौरव करण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालका तर्फे सन्मान चिन्ह (पोलिस पदक) देण्यात येते.गेल्या वर्षी म्हणजे २०२५ सालात अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या सहा पोलिस अधिकाऱ्यांना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते साहेब यांनी कर्तव्यदक्ष, धडाकेबाज, धाडशी, निष्कलंकपणे पोलिस खात्यात सेवा केल्या बद्दल मानाची पोलिस पदके जाहीर केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे साहेब, पोलिस कल्याण कक्षाचे पोलिस निरीक्षक मुक्तारखान पठाण साहेब,नुकतीच पोलिस निरीक्षक पदी बढती मिळालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते साहेब,हवालदार गोविंद गोल्हार साहेब,पोलिस नाईक राजू सुद्रिक,या सहा जणांचा समावेश आहे.पोलीस महा संचालका तर्फे देण्यात येणारे सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत आदराचे आणि उच्च श्रेणीचे पद मानले जाते.हे पद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार गृह खात्याच्या विविध कडक नियमानुसार ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे तपास, नक्षलवादी विरोधी मोहीम, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, किंवा प्रशासकीय कामात सलग १५ वर्षे कोणत्याही प्रकारची शिक्षा न घेता उत्कृष्ट श्रेणीची सेवा दिली आहे अशाच व्यक्तींची या सन्मान पदकांसाठी निवड केली जाते.संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून एकुण ८०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांची या गुण गौरव सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्या सर्वांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातून एकुण सहा जणांची या सन्मान पदकांसाठी निवड करण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या उत्तम कार्य क्षमतेवर पोलिस खात्यातर्फे चांगलेच शिक्कामोर्तब झाले आहे.या सहा जणांच्या पोलीस सन्मान चिन्ह निवडी बद्दल विषेश पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,यांनी या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.हे मानाचे पोलिस पदक मिळवल्या बदल जिल्ह्यातील पोलिस दलाची मान डौलाने उंचावली होती.परंतू अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथिल अपघात ग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड काॅंन्स्टेबल बक्कल क्रमांक (२२५३)अभय काकासाहेब लबडे (वय वर्षे ४०)राहणार खंडोबा नगर शेवगाव आणि पोलिस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक (१०५३)ज्ञानेश्वर मारूती सानप (वय वर्षे ३६) राहणार माळी बाभुळगाव तारकेश्वर नगर ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.अपघात ग्रस्त वाहनांची सुटका करण्यासाठी या दोघांनी वाहन मालकाकडे १५००० रुपयांची मागणी केली होती.त्यापैकी आठ हजार रुपये तक्रारदार यांनी अगोदरच दिले होते.व राहिलेले सात हजार रुपये मिळण्यासाठी या दोन पोलीसांनी वाहन मालकाकडे सारखाच तगादा लावला होता.शेवटी किमान पाच हजार रुपये तरी द्या अशी मागणी केली होती.या पोलीसांच्या सततच्या पैशाच्या मागणीच्या छळाला कंटाळून वाहन मालकाने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला होता.ठरल्या प्रमाणे तक्रारदार हे पाच हजार रुपये घेऊन पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.या दोन पोलीसांनी पैसे स्विकारताच दबा धरून बसलेल्या नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने त्यांना दोघांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई सुरू असताना पोलिस पथकाने एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले तर दुसरा कर्मचारी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.फरार झालेल्या कर्मचाऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या बाबतची घटना अशी की तक्रारदार यांचा मढी गावाजवळ ६ मार्च रोजी बुलेट मोटार सायकलचा अपघात झाला होता.त्या अपघातील बुलेट चालक यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी २४ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची फिर्याद दाखल केली होती.त्या संदर्भात बीट हवालदार अभय काकासाहेब लबडे यांनी तक्रारदार यांना दिनांक २८ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बोलाउन घेऊन त्यांची गाडी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतली होती.सदर गाडी सोडविण्या साठी तक्रारदार यांच्या ऐवजी लायसन्स वाला ड्रायव्हर अपघातातील तपासात दाखविण्या साठी व पुढे कोर्टातील कामकाजात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे सात हजार रुपयांची मागणी केली होती.त्यावरून दिनांक २९ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलिस कॉन्स्टेबल लबडे यांनी किमान पाच हजार रुपये तरी द्या असे म्हणून पाच हजार रुपये स्विकारण्याचे मांन्य केले होते.लगेचच सापळा कारवाई चे आयोजन केले असता आरोपी लोकसेवक यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बीट अंमलदार कक्षात लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्या कडून पंचा समक्ष स्विकारल्या नंतर त्यांनी ती रक्कम त्यांचे बीट मदतनीस ज्ञानेश्वर मारूती सानप यांच्या कडे दिली.सदरची कारवाई ही नाशिक विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल संजय ठाकरे,पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिंदे,यांनी पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.ही कारवाई होताच अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे पोलिस खात्याची लक्तरे चांगलीच महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली आहेत.एकीकडे चांगल्या कामाबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालका कडून जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस पदके जाहीर झाली आणि त्याच जिल्ह्यातील दोन पोलिस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.पोलीस खात्याचा हा केवढा मोठा विरोधाभास आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना न समजणारे हे एक फार मोठे कोडेच निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील पोलिस दलात "कयी खुशी,कभी गम"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या पोलिस पदकामुळे पोलिस खात्याची मान उंचावली होती पण पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या दोन पोलिसांवरील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई मुळे पोलिस खात्याची मान अत्यंत शरमेने खाली गेली आहे.जिल्ह्यातील पोलीसांनी याचा चांगलाच बोध घेतला पाहिजे.पोलीस दलात ईमाने इतबारे चाकरी केली पाहिजे हिच अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली ( रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र पोलीस खात्यात गुणवत्ता पुर्वक सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा मानसन्मान व गुणगौरव करण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालका तर्फे सन्मान चिन्ह (पोलिस पदक) देण्यात येते.गेल्या वर्षी म्हणजे २०२५ सालात अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या सहा पोलिस अधिकाऱ्यांना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते साहेब यांनी कर्तव्यदक्ष, धडाकेबाज, धाडशी, निष्कलंकपणे पोलिस खात्यात सेवा केल्या बद्दल मानाची पोलिस पदके जाहीर केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे साहेब, पोलिस कल्याण कक्षाचे पोलिस निरीक्षक मुक्तारखान पठाण साहेब,नुकतीच पोलिस निरीक्षक पदी बढती मिळालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते साहेब,हवालदार गोविंद गोल्हार साहेब,पोलिस नाईक राजू सुद्रिक,या सहा जणांचा समावेश आहे.पोलीस महा संचालका तर्फे देण्यात येणारे सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत आदराचे आणि उच्च श्रेणीचे पद मानले जाते.हे पद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार गृह खात्याच्या विविध कडक नियमानुसार ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे तपास, नक्षलवादी विरोधी मोहीम, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, किंवा प्रशासकीय कामात सलग १५ वर्षे कोणत्याही प्रकारची शिक्षा न घेता उत्कृष्ट श्रेणीची सेवा दिली आहे अशाच व्यक्तींची या सन्मान पदकांसाठी निवड केली जाते.संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून एकुण ८०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांची या गुण गौरव सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्या सर्वांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातून एकुण सहा जणांची या सन्मान पदकांसाठी निवड करण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या उत्तम कार्य क्षमतेवर पोलिस खात्यातर्फे चांगलेच शिक्कामोर्तब झाले आहे.या सहा जणांच्या पोलीस सन्मान चिन्ह निवडी बद्दल विषेश पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,यांनी या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.हे मानाचे पोलिस पदक मिळवल्या बदल जिल्ह्यातील पोलिस दलाची मान डौलाने उंचावली होती.परंतू अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथिल अपघात ग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड काॅंन्स्टेबल बक्कल क्रमांक (२२५३)अभय काकासाहेब लबडे (वय वर्षे ४०)राहणार खंडोबा नगर शेवगाव आणि पोलिस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक (१०५३)ज्ञानेश्वर मारूती सानप (वय वर्षे ३६) राहणार माळी बाभुळगाव तारकेश्वर नगर ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.अपघात ग्रस्त वाहनांची सुटका करण्यासाठी या दोघांनी वाहन मालकाकडे १५००० रुपयांची मागणी केली होती.त्यापैकी आठ हजार रुपये तक्रारदार यांनी अगोदरच दिले होते.व राहिलेले सात हजार रुपये मिळण्यासाठी या दोन पोलीसांनी वाहन मालकाकडे सारखाच तगादा लावला होता.शेवटी किमान पाच हजार रुपये तरी द्या अशी मागणी केली होती.या पोलीसांच्या सततच्या पैशाच्या मागणीच्या छळाला कंटाळून वाहन
मालकाने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला होता.ठरल्या प्रमाणे तक्रारदार हे पाच हजार रुपये घेऊन पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.या दोन पोलीसांनी पैसे स्विकारताच दबा धरून बसलेल्या नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने त्यांना दोघांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई सुरू असताना पोलिस पथकाने एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले तर दुसरा कर्मचारी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.फरार झालेल्या कर्मचाऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या बाबतची घटना अशी की तक्रारदार यांचा मढी गावाजवळ ६ मार्च रोजी बुलेट मोटार सायकलचा अपघात झाला होता.त्या अपघातील बुलेट चालक यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी २४ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची फिर्याद दाखल केली होती.त्या संदर्भात बीट हवालदार अभय काकासाहेब लबडे यांनी तक्रारदार यांना दिनांक २८ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बोलाउन घेऊन त्यांची गाडी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतली होती.सदर गाडी सोडविण्या साठी तक्रारदार यांच्या ऐवजी लायसन्स वाला ड्रायव्हर अपघातातील तपासात दाखविण्या साठी व पुढे कोर्टातील कामकाजात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे सात हजार रुपयांची मागणी केली होती.त्यावरून दिनांक २९ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलिस कॉन्स्टेबल लबडे यांनी किमान पाच हजार रुपये तरी द्या असे म्हणून पाच हजार रुपये स्विकारण्याचे मांन्य केले होते.लगेचच सापळा कारवाई चे आयोजन केले असता आरोपी लोकसेवक यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बीट अंमलदार कक्षात लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्या कडून पंचा समक्ष स्विकारल्या नंतर त्यांनी ती रक्कम त्यांचे बीट मदतनीस ज्ञानेश्वर मारूती सानप यांच्या कडे दिली.सदरची कारवाई ही नाशिक विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल संजय ठाकरे,पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिंदे,यांनी पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.ही कारवाई होताच अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे पोलिस खात्याची लक्तरे चांगलीच महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली आहेत.एकीकडे चांगल्या कामाबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालका कडून जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस पदके जाहीर झाली आणि त्याच जिल्ह्यातील दोन पोलिस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.पोलीस खात्याचा हा केवढा मोठा विरोधाभास आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना न समजणारे हे एक फार मोठे कोडेच निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील पोलिस दलात "कयी खुशी,कभी गम"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या पोलिस पदकामुळे पोलिस खात्याची मान उंचावली होती पण पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या दोन पोलिसांवरील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई मुळे पोलिस खात्याची मान अत्यंत शरमेने खाली गेली आहे.जिल्ह्यातील पोलीसांनी याचा चांगलाच बोध घेतला पाहिजे.पोलीस दलात ईमाने इतबारे चाकरी केली पाहिजे हिच अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.
- "उष्माघाताने फळविक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यात हळहळ" शासनाने तात्काळ मदत करावी पाचोरा काँग्रेसची मागणी पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या आनंद नथ्थु भोई (वय 32) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोई हे दररोजप्रमाणे चौकात काकडी विक्री करत होते. सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात काम करताना त्यांनी डोक्यावर कोणतेही संरक्षण (टोपी, अंगावर कापड) घेतले नव्हते. परिणामी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच, आनंद भोई हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी केली आहे. मयताच्या पश्चात विधवा आई, पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे, तसेच पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1