logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर येथील नव्याने स्थापन झालेल्या ओंकारेश्वर सार्वजनिक वाचनालयात बाबासाहेब आंबेडकर यांची डॉ. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ओंकारेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न उदगीर (एल पी उगीले) येथील ओंकारेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. शहराचे माजी नगर अध्यक्ष सुधीर भाऊ भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील ध्वज फडकवण्यात आला. सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उदगीर येथील माजी नगर अध्यक्ष सुधीर भाऊ भोसले यांच्या वतीने प्रेरणादायी व विचारप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर प्रखरपणे अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती माजी प्राध्यापक बिरबल नाईक , श्रीनिवास पेन्सलवार ,चंद्रशेखर पुणे , अभियंता अशोकराव नाईक ,सचिन हुडगे, उद्योगपती शंकर माळगे, माणिक खडके ,पत्रकार रामबीलास नावंदर ,राजकुमार स्वामी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. “ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या आंबेडकर यांच्या विचाराचे मूल्य ओळखून आम्ही मानाने जगतो,” या ओळींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. बाबासाहेबांचे स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्त्वज्ञान आजच्या समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे रामबीलास नावंदर यांनी सांगितले. “भारतातील सर्वसमावेशक राज्यघटना ही बाबासाहेबांची सर्वात मोठी देणगी असून, याच संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला,” असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे नमूद केले की, बाबासाहेबांनी शोषित, वंचित समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणून सामाजिक क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचा सखोल उहापोह केला. त्यांनी महात्मा गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून प्रेरणा घेत बाबासाहेबांनी समाजपरिवर्तनाची चळवळ उभारली, असे सांगितले. महाड चवदार तळे सत्याग्रह व काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक संघर्षांचा उल्लेख करत त्यांनी “वाचाल तर वाचाल” हा संदेश आजही तितकाच प्रभावी असल्याचे प्रतिपादन केले. बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाचा उल्लेख करत, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश नव्या पिढीने आत्मसात करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबीलास नावंदर यांनी केले राजकुमार स्वामी यांनी परिश्रम घेतले.

on 14 April
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 14 April
e93c81c6-e93f-4504-9cfe-80ffbfb1836e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    1
    लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. 
रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक एक मे 2026.
लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली.
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. 
यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!! आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन! तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र! 🇮🇳 #maharashtra #bjp #devendrafadnavis
    1
    प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा!!!
आज आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला महाराष्ट्र दिन!
तमाम महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणारा आपला महाराष्ट्र उज्ज्वल भवितव्याची चाहूल देत आहे.
आपण सर्वांनी मिळून हा प्रगतीचा प्रवास अधिक बळकट करूया म्हणतं भाजपा नेत्या प्रेरणा होनराव यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा.
जय महाराष्ट्र! 🇮🇳
#maharashtra #bjp #devendrafadnavis
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.