logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार आर्णी:येथीलनारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ ला सायंकाळी 'नारायणलीला सांझ' हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात शाळेच्या बालकलाकारांनी पारंपारिक लोक-नृत्य, लोक-संगीत आणि एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रमोदजी बुब सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार नौशाद अली सर आणि युवा पत्रकार इमरान बेग सर हे होते. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन,फोटो पूजन झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम झालेल्या लहान-लहान मुलाच्या पदलालित्यांनी रसिकांचे मनं मोहून घेतली. त्या नंतर एका मागून एक अशा सरस नृत्यांच्या व एकांकिकांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये भारतातील वेगवेगळ्या भाषांवर आधारित लोकनृत्य सादर करण्यात आले. एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकले. या कार्यक्रमाला शाळेचे कार्यवाहक प्रकाश ठाकरे सर, प्राचार्य भाग्यश्री निवल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर शाळेचे प्रत्येक शिक्षक-शिक्षिका हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाम शेख सर यांच्या मार्गदर्शनात नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सकवान सर यांनी केले.

3 hrs ago
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
3 hrs ago
cbd0b4bb-3813-4d16-af5d-f59f9069ab63

नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार आर्णी:येथीलनारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ ला सायंकाळी 'नारायणलीला सांझ' हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात शाळेच्या बालकलाकारांनी पारंपारिक लोक-नृत्य, लोक-संगीत आणि एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रमोदजी बुब सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार नौशाद अली सर आणि युवा पत्रकार इमरान बेग सर हे होते. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन,फोटो पूजन झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम झालेल्या लहान-लहान मुलाच्या पदलालित्यांनी रसिकांचे मनं मोहून घेतली. त्या नंतर एका मागून एक अशा सरस नृत्यांच्या व एकांकिकांच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये भारतातील वेगवेगळ्या भाषांवर आधारित लोकनृत्य सादर करण्यात आले. एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकले. या कार्यक्रमाला शाळेचे कार्यवाहक प्रकाश ठाकरे सर, प्राचार्य भाग्यश्री निवल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर शाळेचे प्रत्येक शिक्षक-शिक्षिका हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाम शेख सर यांच्या मार्गदर्शनात नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सकवान सर यांनी केले.

More news from Yavatmal and nearby areas
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    23 min ago
  • दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला  उशिरा रात्री  झालेल्या मारहाणीच्या घटनेने  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी  रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या   उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी  दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक  संघटनाणी रात्री ७. ३० वाजता  निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
    2
    दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला  उशिरा रात्री  झालेल्या मारहाणीच्या घटनेने  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटना १६ फेब्रुवारी  रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या   उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी  दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक  संघटनाणी रात्री ७. ३० वाजता  निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    22 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🕉️📖 महाशिवरात्री विशेषांकाचे दिमाखदार विमोचन! 📖🕉️ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात “श्रमिक लोकराज्य” दैनिकाच्या महाशिवरात्री उत्सव 2026 विशेषांकाचे उत्साहात विमोचन संपन्न झाले. या विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मंदिर कमिटी पदाधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती आणि समाजमनाचे दर्शन घडवणारा हा विशेषांक वाचकांसाठी पर्वणी ठरत आहे. 🙏 #श्रमिकलोकराज्य #महाशिवरात्रीविशेषांक #Mahashivratri2026 #हिमायतनगर #दैनिकविमोचन धार्मिकउत्सव ShivBhakti MediaNews NNLDigitalMedia
    1
    🕉️📖 महाशिवरात्री विशेषांकाचे दिमाखदार विमोचन! 📖🕉️
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात
“श्रमिक लोकराज्य” दैनिकाच्या महाशिवरात्री उत्सव 2026 विशेषांकाचे
उत्साहात विमोचन संपन्न झाले.
या विशेषांकाचे प्रकाशन
माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर
यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मंदिर कमिटी पदाधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्म, संस्कृती आणि समाजमनाचे दर्शन घडवणारा हा विशेषांक वाचकांसाठी पर्वणी ठरत आहे. 🙏
#श्रमिकलोकराज्य
#महाशिवरात्रीविशेषांक
#Mahashivratri2026
#हिमायतनगर
#दैनिकविमोचन
धार्मिकउत्सव
ShivBhakti
MediaNews
NNLDigitalMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    1
    अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.