logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास वैतागलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या, सावकारावर गुन्हा दाखल व्याजाचे पैसे परत करण्यासाठी मानसिक त्रास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा उदगीर (प्रतिनिधी) हंडरगुळी येथील शेतकऱ्याला व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ, धमकी देऊन मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास शिवाजी बोळेगावे (वय ४५, रा. हंडरगुळी, ता. उदगीर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजण्यापूर्वी हंडरगुळी शिवारातील मोरतळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात घडली. रामदास बोळेगावे हे शेतीसोबत पिग्मी एजंट म्हणूनही काम करीत होते. याप्रकरणी मृत रामदास बोळेगावे यांचे भाऊ विलास शिवाजी बोळेगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रम ऊर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने (जीवन माने यांचे वडील), तिघेही रा. हाळी, ता. उदगीर, यांनी संगनमत करून रामदास यांना व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ व धमकी दिली. तसेच मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा पूर्वइतिहास नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपास ते स्वतः करीत आहेत.

48 min ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
48 min ago
3a6ab3c9-dd23-4522-af9a-9d20f798ebb1

व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास वैतागलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या, सावकारावर गुन्हा दाखल व्याजाचे पैसे परत करण्यासाठी मानसिक त्रास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा उदगीर (प्रतिनिधी) हंडरगुळी येथील शेतकऱ्याला व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ, धमकी देऊन मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास शिवाजी बोळेगावे (वय ४५, रा. हंडरगुळी, ता. उदगीर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजण्यापूर्वी हंडरगुळी शिवारातील मोरतळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात घडली. रामदास बोळेगावे हे शेतीसोबत पिग्मी एजंट म्हणूनही काम करीत होते. याप्रकरणी मृत रामदास बोळेगावे यांचे भाऊ विलास शिवाजी बोळेगावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रम ऊर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने (जीवन माने यांचे वडील), तिघेही रा. हाळी, ता. उदगीर, यांनी संगनमत करून रामदास यांना व्याजाने दिलेले पैसे व त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ व धमकी दिली. तसेच मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा पूर्वइतिहास नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपास ते स्वतः करीत आहेत.

More news from Maharashtra and nearby areas
  • माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    1
    माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख 
हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट
शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते. नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत.
या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. 
नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व
कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. 
या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि
आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार  गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी
स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, 
प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    1
    गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल
कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून  4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
    2
    बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण!

बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण!
बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. 
गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    1
    बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय  म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील
हृदया दीपक शेठ पाटील  हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    user_Vishnu shirame
    Vishnu shirame
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    1
    Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!
    user_Ramprasad Gaikwad
    Ramprasad Gaikwad
    Lawyer बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • साखरेचा ट्रक रस्त्यात उलटला अन् लोकांनी साखरच पळवली; पोती उचलण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड; VIDEO व्हायरल साखरेने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती उचलून आपल्या घराकडे नेताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
    1
    साखरेचा ट्रक रस्त्यात उलटला अन् लोकांनी साखरच पळवली; पोती उचलण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड; VIDEO व्हायरल साखरेने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती उचलून आपल्या घराकडे नेताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
    1
    जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    21 hrs ago
  • नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    1
    नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.