राष्ट्रवादी काँग्रेस रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल विठ्ठलराव मगर यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल विठ्ठलराव मगर यांची नियुक्ती रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल विठ्ठलराव मगर यांची नियुक्ती करण्यात आली. वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या हस्ते गोपाळ मगर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा ठाकरे यांनी, “गोपाल विठ्ठलराव मगर हे रिसोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील,” असा विश्वास व्यक्त केला. रिसोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी गोपाळ मगर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना गोपाल मगर म्हणाले, “पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी तसेच शहरातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार रिसोड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.” यावेळी गजानन पाटील, आरू प्रवक्ता विभाग वाशिम, तेजराव पाटील वानखडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रिसोड, श्रावण भाऊ जमदाडे, अमर कानडे, पत्रकार गजानन बाजड, प्रदेश सचिव अल्ताफ भाई घनकर, युवा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील सरकटे, गोपाल मोरे शहर महामंत्री, भारत गुंजकर, सदाशिव कांबळे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- काळजाला थरकाप उडवणारी घटना "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?" माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्यासमोर आत्महत्याग्रस्त महिलेच्या लेकीचा टाह़ो! सेनगाव/विश्वनाथ देशमुख सण-उत्सवाच्या दिवशी जिथे अवघा महाराष्ट्र बळीराजाच्या कृतज्ञतेत मग्न होता,तिथेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी या दुष्टचक्रात अडकलेल्या महिला शेतकरी कमलाबाई सोपान कांदे यांनी बैलपोळ्याच्या दिवशीच विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ऐन सणासुदीला घरातून उठलेल्या या अंत्ययात्रेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी घटनेनंतर विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी गोजेगाव येथे जाऊन पीडित कांदे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.मात्र,या भेटीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. "माझी आई आणली का हो?..." विवाहित लेकीच्या आक्रोशाने काळीज पाझरले माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे कांदे यांच्या घरी पोहोचताच,मृत कमलाबाई यांच्या विवाहित मुलीने त्यांना पाहताच हंबरडा फोडला. "तुम्ही माझी आई घेऊन आले का हो?"असा आर्त प्रश्न विचारत तिने थेट त्यांचा समोर टाहो फोडला.आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या त्या लेकीचा आक्रोश आणि डोळ्यांतील अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून निघाले.जिचे माहेरचे छत्र कायमचे हरपले आहे,त्या दुःखी कन्येचा हा प्रश्न केवळ एका नेत्याला नसून,संपूर्ण शासकीय व्यवस्थेला आणि समाजाच्या संवेदनशीलतेला सुन्न करणारा होता.माहितीनुसार,कांदे कुटुंबाने शेतीसाठी घेतलेले कर्ज तसेच नातेवाईकांचे कर्ज होते.यंदाही पावसाने दगा दिल्यामुळे शेतातून हाती काहीच लागणार नाही,ही भीती आणि कर्जाच्या हप्त्यांचा तगादा यांमुळे कमलाबाई अत्यंत मानसिक तणावात होत्या.अखेर याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विरोधी पक्षनेते पोहोचले,पण सरकार कधी जागे होणार? या हृदयद्रावक घटनेची दखल घेत विरोधी पक्षाचे नेते गोजेगावच्या या पीडित कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचले. त्यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत मराठवाड्यातील कोरड्या दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.मात्र,अत्यंत खेदाची बाब अशी की,घटना घडून एवढे दिवस झाले तरी शासकीय यंत्रणा आणि हक्काची सरकारी मदत अद्याप या अनाथ कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही.एकीकडे शासन विविध योजनांचे ढोल पिटत असताना,दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर मात्र मदतीअभावी शेतकरी कुटुंबांची अशी वाताहत होत आहे.या दुःखी लेकीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार देण्यासाठी मायबाप सरकार आतातरी जागे होऊन तात्काळ मदत जाहीर करणार का? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च1
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1