अहिल्यानगर येथील जिल्हा आयुष रुग्णालयात पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन आर्मी कोअर समितीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रुग्णालयाच्या आवारात विविध औषधी तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याला जिल्हा सल्लागार प्रा. हर्षल आगळे, सनियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्या श्रीमती सविताताई मोरे, दत्ता गाडळकर, अजित कटारिया, राजेंद्र देशमुख, अभियंता प्रताप भाऊसाहेब काळे, संजय जोशी, बंडू पवार आणि जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रुग्णालय परिसरात बकुळ, आपटा, चिंच, कडुलिंब यांसह विविध औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थितांना वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनातील वृक्षांची भूमिका आणि वृक्षांची नियमित जोपासना करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. महानगरपालिकेकडून वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याकरिता जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या ग्रीन आर्मी व वनमहोत्सव उपक्रमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. नाझिया शेख, डॉ. हरलीन कौर पुरी, संगीता नन्नवरे, सहाय्यक अधिसेवक अजिंक्य पवार, वर्षा जाधव, विशाल केदारी, अश्विनी बोरगे, योगिता कदम, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, पवन शिसोदे, हर्षा फाळके, एलिझाबेथ तेलधुणे, चैतन्य निकम तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या मुलींसाठी मोफत निवासी आणि भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुणी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. या मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. इच्छुकांना पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागेल. या सुवर्णसंधीबाबत अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मुलींनी आजच आपले अर्ज सादर करून पोलीस किंवा सैन्यदलातील करिअरच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकावे.1
- शिरूर तालुक्यातील कान्हेर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत एवरी डेनिसन व मॅजिक बस यांच्या सहकार्याने लोकशाही पद्धतीने विद्यार्थी बालपंचायत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया केवळ प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्व, समानता, सहभाग आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान केंद्रावरील सर्व सूचनांचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही दबाव, प्रभाव किंवा पक्षपाताशिवाय स्वतःच्या विचारांनुसार योग्य उमेदवाराची निवड करावी, कारण प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातूनच सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडू शकते.1
- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.1
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- मापेगाव निम्न दुधना प्रकल्पातील मच्छीमारांचे जाळे जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मच्छीमारांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.1
- पुणे जिल्ह्यातील बारामती येथील उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंढरपूर वारीदरम्यान माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर त्यांनी थेट वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केले. या कृतीतून सुनेत्रावहिनींनी अजितदादांच्या साधेपणाचा वारसा पुढे चालवत वारकरी परंपरेचा मोठा सन्मान केला आहे. वारीच्या या निमित्ताने त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच सर्वांना संस्कार आणि सेवाभावाचा एक सुंदर संदेश दिला आहे।1
- येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.1