logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर..! नांदेड:- बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने समता परिषद कार्यालय, मयूर टॉकीज, नाईकनगर, नांदेड येथे आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक प्रवीण जेठेवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील सहा हजार जातीना जोडून बहुजन समाजाची संकल्पना मांडणारे मान्यवर कांशीराम जी यांची प्रेरणा घेऊन "अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद" ही अराजकीय सामाजिक संघटना आपली वाटचाल सुरु ठेवणार आहे, याबद्दल सविस्तर विचारविनिमय या शिबिरातून करण्यात येणार आहे तसेच कांही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वेळेवर शिबीर सुरु होणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

on 11 March
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
on 11 March
f2ff2f51-938d-44a2-aa9b-fca6ac97c495

कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर..! नांदेड:- बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथे रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने समता परिषद कार्यालय, मयूर टॉकीज, नाईकनगर, नांदेड येथे आयोजित या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन युवा उद्योजक प्रवीण जेठेवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील सहा हजार जातीना जोडून बहुजन समाजाची संकल्पना मांडणारे मान्यवर कांशीराम जी यांची प्रेरणा घेऊन "अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद" ही अराजकीय सामाजिक संघटना आपली वाटचाल सुरु ठेवणार आहे, याबद्दल सविस्तर विचारविनिमय या शिबिरातून करण्यात येणार आहे तसेच कांही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वेळेवर शिबीर सुरु होणार असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल 
नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे.
दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले.
नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    1
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष!
हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
#DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत
    2
    मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत.
अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही.
आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे.
प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमरी फाटा येथील रस्तारोको आंदोलन स्थगित
    1
    रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमरी फाटा येथील रस्तारोको आंदोलन स्थगित
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 day ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.