सरदार पटेल महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात चंद्रपूर : येथील सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, मेरा युवा भारत, चंद्रपूरचे कार्यक्रम अधिकारी मंगेश दुबे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. निखिल देशमुख तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृतीपर वृक्षदिंडीने झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वृक्षदिंडीनंतर महाविद्यालय परिसरात १० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच २०० विद्यार्थ्यांना आपल्या घरी लावण्यासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात आलीत. प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
सरदार पटेल महाविद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण उत्साहात चंद्रपूर : येथील सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, मेरा युवा भारत, चंद्रपूरचे कार्यक्रम अधिकारी मंगेश दुबे, शारीरिक शिक्षण संचालिका
डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. निखिल देशमुख तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृतीपर वृक्षदिंडीने झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वृक्षदिंडीनंतर महाविद्यालय परिसरात १० रोपांचे
वृक्षारोपण करण्यात आले. तसेच २०० विद्यार्थ्यांना आपल्या घरी लावण्यासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात आलीत. प्रत्येक विद्यार्थ्याने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
- पवित्रता व परमात्मप्रेमाचा संदेश देत ब्रह्माकुमारीजमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कामठी सेवा केंद्राच्या वतीने रक्षाबंधन पर्व आध्यात्मिक उत्साह, पवित्रता आणि परमात्मप्रेमाच्या वातावरणात मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, भाऊ-बहिणी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात परमात्म स्मरणाने करण्यात आली. यानंतर ब्रह्माकुमारी बहिणींनी उपस्थितांना राखी बांधून ईश्वरीय मर्यादा, पवित्रता, सद्भावना आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प दिला. यावेळी ब्रह्माकुमारी बी.के. प्रेमलता दीदी (संचालिका, कामठी क्षेत्र) यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, खरी रक्षा ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, बुद्धी आणि विचारांना विकार व नकारात्मकतेपासून सुरक्षित ठेवण्यात आहे. राखी आत्म्याला परमात्मप्रेमाशी जोडून जीवनात शांती, पवित्रता आणि सद्भावना रुजविण्याचा संदेश देते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पलोटी स्कूलच्या व्यवस्थापिका शिमिला मॅडम, प्राचार्या अनिला मॅडम, पीएसआय पवार, रूची अॅग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. त्यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार देवराव रडके, नागोराव साबळे, देवराव आमधरे, विमलताई साबळे, गुलाबराव ढेंगे, निलेश रावेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना राखी बांधून तिलक लावण्यात आले तसेच ईश्वरीय प्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांतता, प्रेम आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेला होता. या उपक्रमातून समाजात बंधुभाव, प्रेम, पवित्रता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देण्यात आला.2
- बोदा गावात सार्वजनिक देणगीतून बांधलेल्या सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तिरोडा:- बोदा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेडच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन बुधवारी सार्वजनिक देणग्यांतून करण्यात आले. ही इमारत गावकरी आणि संस्थेच्या सदस्यांकडून गोळा केलेल्या देणग्यांमधून बांधण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या हस्ते झाले. तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओम भाऊ पाटले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अविनाशजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने अधिकारी, संचालक मंडळ, मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी वक्त्यांनी नमूद केले की, गावकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून आणि सार्वजनिक देणग्यांमधून संस्थेसाठी ही इमारत बांधली आहे. हे निश्चितच ग्रामीण एकतेचे आणि सहकार्याच्या भावनेचे उदाहरण आहे. तथापि, ही परिस्थिती ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांप्रति सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्नही निर्माण करते. ग्रामीण भागातील विकासासाठी सरकारी योजना आणि निधी उपलब्ध असूनही, जर एखाद्या सहकारी संस्थेला स्वतःची इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक देणग्या गोळा कराव्या लागत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण लोकसंख्येचा विकास आणि सहकारी संस्थांच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी केवळ जनतेचीच आहे का? सरकारने ग्रामीण भागाच्या खऱ्या गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि सहकारी संस्थांना आवश्यक पाठिंबा दिला पाहिजे. सार्वजनिक देणग्यांनी बांधलेली ही इमारत सार्वजनिक एकतेचे प्रतीक आहे, परंतु ती सरकारकडे ठोस पावले उचलण्याची आणि ग्रामीण विकास, सहकारी संस्था व शेतकरी-संबंधित संघटनांना बळकट करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करते. कार्यक्रमाच्या शेवटी, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुणे, सदस्य आणि गावकऱ्यांचे आभार मानले.1
- अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड4
- गोंदिया के टांडा-अदासी मार्ग पर गड्ढे, कापसे कॉलेज ने की मरम्मत खबर और विज्ञापन के लिये 9607860369 पर कॉल करें, डायरेक्टर एवं मुख्य संपादक भूषण राजे1
- मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन1
- अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई जश्ने ईद मिलादुन्नबी ईद पर 'लब्बैक या रसूल अल्लाह' की गूंज गोंदिया, ब्यूरो. इस्लाम के पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहो अलैहि वसल्लम) की विलादत के मुबारक अवसर पर शहर में जश्न-ए-ईद मिलादुन्नबी पूरे अकीदत, उत्साह और सौहार्द के साथ मनाया गया. इस अवसर पर शहर की फिजा 'लब्बैक या रसूल अल्लाह' की सदाओं से गूंज उठी. मरकजी सीरतुन्नबी कमेटी की निगरानी में निकाले गए जुलूस-ए-मोहम्मदिया में बड़ी संख्या में मुस्लिम समाज के लोगों ने हिस्सा लिया. पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद (स.अ.व.) की तालीमात को इंसानियत, अमन, सादगी, गरीबों, बेसहारा और जरूरतमंदों के अधिकारों तथा महिलाओं और बेटियों के सम्मान का संदेश बताते हुए शहरभर में मिलाद का जश्न मनाया गया अनवारे मुस्तफा कमेटी शास्त्री वार्ड मे नाश्ते के अनेक प्रकार स्वादिष्ट जलपान या अल्पाहार पानी शरबत की कोल्ड ड्रिंक व्यवस्था की गई मरकजी कमेटी के सदर 'ईशान' शेख का जगह-जगह इस्तकबाल जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के आयोजन में मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर जनाब ईरशाद (ईशान) शेख का विभिन्न चौक-चौराहों पर गर्मजोशी से स्वागत किया गया. मुस्लिम समाज के लोगों के साथ ही अन्य समाज के नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और राजनीतिक क्षेत्र से जुड़े लोगों ने भी फूलों की मालाएं व गुलदस्ते भेंट कर उनका इस्तकबाल किया. मरकजी सीरतुन्नबी कमेटी के सदर ईरशाद (ईशान) शेख और कमेटी पदाधिकारियों ने जुलूस के सफल व शांतिपूर्ण आयोजन में सहयोग देने वाले पुलिस प्रशासन, सामाजिक संगठनों, विभिन्न समाजों के नागरिकों तथा सभी सहयोगियों का आभार व्यक्त किया. परचमकुशाई और सलात-ओ-सलाम : जुलूस से पहले शहर की विभिन्न मस्जिदों में सुबह सादिक के समय नमाज-ए-फजर अदा की गई. इसके बाद परचमकुशाई की रस्म हुई सब्ज पताकों, रोशनी और आकर्षक गेटों से सजा शहर जश्न-ए-ईद मिलादुन्नबी को लेकर शहर के विभिन्न हिस्सों में विशेष सजावट की गई. प्रमुख मागों और मुस्लिम बहुल क्षेत्रों में सब्ज पताकाएं, आकर्षक रोशनी और स्वागत द्वार लगाए गए. कई स्थानों पर इस्लामी झांकियां भी तैयार की गईं, जिन्होंने लोगों का ध्यान आकर्षित किया. जुलूस-ए-मोहम्मदिया का समापन सुभाष स्कूल ग्राउंड में हुआ. इसके बाद सुभाष स्कूल ग्राउंड के साथ ही हुसैनी चौक, रामनगर और बाजार चौक में आम लंगर का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोगों ने सहभागिता की. जुलूस के दौरान अकीदतमंदों ने नात-ए-पाक पढ़ते हुए और दरूद-ओ-सलाम पेश करते हुए अपने नबी की आमद की खुशी का इजहार किया. तथा पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) की विलादत के मौके पर सलात-ओ-सलाम का नजराना पेश किया गया. अफसरी कादिर शेख जिला - गोंदिया4
- इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.1
- चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1