logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खरीप २०२६-२७ साठी राज्य सज्ज; १४५.२० लाख हेक्टर पेरणीचे लक्ष्य... पर्जन्यमान ९२% राहण्याचा अंदाज; ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना पुणे : प्रतिनिधी आगामी खरीप हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने व्यापक नियोजन केले असून सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सोयाबीन, भात, मका, तूर, उडीद, कापूस आणि ऊस या प्रमुख पिकांचा यात समावेश आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेनंतर ही माहिती दिली. शिवाजीनगर परिसरातील सारथी संस्थेच्या नव्या सभागृहात खरीप हंगाम नियोजनाबाबत ही महत्त्वाची बैठक पार पडली. या कार्यशाळेत कृषी विभागाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांचे अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे ९२ टक्के राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसात अनियमितता आणि काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाणे आणि खते वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठीही शासनाने ठोस पावले उचलली आहेत. यावर्षी सुमारे २०.१७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून २८.०५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. खतांच्या बाबतीतही ४८.८० लाख मेट्रिक टन वाटप मंजूर झाले असून आतापर्यंत २५.१७ लाख मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाईची शक्यता नसल्याचा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांना विविध पर्याय सुचविण्यात आले आहेत. यामध्ये हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्रज्ञान, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग आणि सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब यांचा समावेश आहे. ‘महाकृषि’ अॅपसह विविध डिजिटल माध्यमांतून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून ३० जूनपर्यंत ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मागील काळात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी २०२५ पासून १३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या १०५ लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला असून त्यासाठी २० हजार कोटी रुपयांहून अधिक मदत मंजूर करण्यात आली आहे. अलीकडील अवकाळी पावसामुळेही नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. पत्रकार परिषदेदरम्यान कर्जमाफीसंदर्भातील प्रश्नांवर कृषी मंत्र्यांनी थेट संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती स्पष्ट केली. त्यामुळे उपस्थित पत्रकारांच्या शंकांचे निरसन झाले. एकूणच, हवामानातील अनिश्चितता आणि मागील नुकसानीच्या पार्श्वभूमीवरही राज्य शासनाने व्यापक तयारी करत खरीप हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

11 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
11 hrs ago
d29d3ebc-81f2-4c1b-8b03-05cfa43f3db5

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    1
    shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu
    user_Shekhar Rajendra kondurka
    Shekhar Rajendra kondurka
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!
    1
    पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, 
चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by अमोल भालेराव
    4
    Post by अमोल भालेराव
    user_अमोल भालेराव
    अमोल भालेराव
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    1
    पिंपरी चिंचव्हडं :-
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला....
भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले....
#नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी
#NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
    2
    मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न 
विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.