Shuru
Apke Nagar Ki App…
शाळा शिकण्यासाठी मुलाखतीची आवश्यकता का, असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. शिक्षण घेण्यापूर्वी मुलाखत घेण्याच्या पद्धतीवर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
YUVA JALNA NEWS
शाळा शिकण्यासाठी मुलाखतीची आवश्यकता का, असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. शिक्षण घेण्यापूर्वी मुलाखत घेण्याच्या पद्धतीवर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना पोलिसांनी वाळू माफियांवर मोठी कारवाई करत एक महत्त्वपूर्ण दणका दिला आहे. खरपुडी शिवारात केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३५० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे चोरट्यांनी बचत गटाचे कार्यालय आणि एका घराला लक्ष्य करत चोरी केली आहे. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी फोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा प्रकार घडवला.1
- विडोळी ते देवठाणा (मंठा) येथील शिवपांदण रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण तब्बल १५ दिवसांपासून सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालय परिसरात चारा, पाणी आणि वैरण घेऊन अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विडोळी खुर्द आणि विडोळी बु. शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा हा शिवपांदण रस्ता अनेक वर्षांपासून वादात अडकला आहे. या रस्त्याचे बहुतांश काम लोकवर्गणीतून पूर्ण झाले असले, तरी उर्वरित काही अंतराच्या कामात काही शेतकऱ्यांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. यासंदर्भात अनेकवेळा निवेदने, तक्रारी, पंचनामे आणि नोटिसा देऊनही रस्ता प्रत्यक्षात खुला न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आणि कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेती हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने, रस्ता बंद असल्यामुळे शेतमाल वाहतूक, जनावरांची ने-आण तसेच दैनंदिन शेतीची कामे करताना मोठ्या अडचणी येत आहेत. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात चारा, पाणी व वैरण आणून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रशासनाला आता तरी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे म्हटले आहे. या आंदोलनामुळे मंठा तालुक्यात शिवपांदण रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- मंठा येथे हिंदू जनजागरण समिती आणि अशोक भाऊ चव्हाण सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन संरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील चलानी कॉलनीतील राम मंदिराजवळ दिनांक १६ जून ते २७ जून या कालावधीत हे शिबिर भरवण्यात येणार आहे. सर्व युवक-युवतींनी सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि अशोक भाऊ चव्हाण सेवा संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविशंकर तुपकर यांच्या सरसकट कर्जमाफी आणि पिक विम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे. शेतकरी संघटनांनी या लढ्याला एकजूट दाखवली असून, बुधवारी हा संघर्ष आणखी तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.1
- कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जळगाव जामोद तालुक्यात शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरले असून, त्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. सकाळी ११ वाजतापासून तहसील कार्यालयावर चढून शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान, उदयनगरात दोन शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले असून त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयाच्या गेटसमोर देखील अनेक शेतकरी उपस्थित राहून सरकारविरोधात घोषणा देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.1
- जाफ्राबाद तालुक्यात अवैध वाळू उपशावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये ८ हायवा ट्रक आणि १ जेसीबीसह कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि जाळपोळ करू नये. त्यांनी शेतकऱ्यांना शांतता, संयम आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करत, आपल्या एकजुटीची ताकद सरकारला दाखवून देण्यास सांगितले आहे. सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठीचा हा लढा लोकशाही मार्गानेच जिंकायचा असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तहसील कार्यालयात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने कार्यालयात व्हिडिओ काढल्याने कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात हाणामारी झाली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.1